लखनऊ : येणाऱ्या नव्या वर्षात सरकार चार लाख नोकऱ्या देणार असल्याची घोषणा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलीये.
डॉ. राम मनोहर लोहिया राष्ट्रीय विधी विद्यालयात बोलताना त्यांनी ही घोषणा केली. पुढील वर्ष हे तरुणांसाठी समर्पित असेल. सरकारचे पहिले वर्ष शेतकऱ्यांसाठी होते. पुढील वर्षात चार लाख भरती केली जाईल, असे योगी आदित्यनाथ यांनी सांगितले.
योगी आदित्यनाथ यांनी कौशल्य विकास मिशनअंतर्गत दोन अॅप स्किल कनेक्ट आणि स्किल मित्र आणि महिंद्रा ग्रुप प्रशिक्षित तरुणांसाठी रोजगार सहाय्यतेसाठी विकसित मोबाईल अॅप 'मिस्टर उपाय' लाँच केले.
याशिवाय, गोरखपूरमधील एक आणि लखनऊच्या दोन कौशल्य प्रशिक्षण केंद्रांचेही उद्घाटन केले. त्यांनी बरेलीच्या बहेडी, रामपुरमधील मिलक, शहजहांपूरमधील तिलहर, लखनऊमधील सरोजनीनगर आणि हरदोईच्या संडीलामध्ये पंतप्रधान कौशल्य विकास केंद्रांची पायाभरणी केली.
योगी आदित्यनाथ म्हणाले, कौशल्या विकास मिशनअंतर्गत सहा लाखाहून अधिक युवकांना प्रशिक्षणासाठी निवडण्यात आले असून यातील चार लाख युवकांचे प्रशिक्षण पूर्ण झालेय. विविध कंपन्यांमध्ये यांना रोजगार मिळालाय. शेतकऱ्यांना ७० हजार करोड रुपयांहून अधिक रोख मदत सरकारने दिलीय. चार लाख भरतींशिवाय इन्वेस्टर्स समिटच्या माध्यमातून सरकारने पाच लाख कोटी रुपये गुंतवलेत.