Bank News : आजपासून 'ही' बँक पूर्णत: Private; सरकारला कोट्यवधींचा नफा

मागील काही दिवसांपासून (Air India) एअर इंडियासह अनेक संस्थांचं खासगीकरण करणाऱ्या केंद्र सरकारनं आता आपला मोर्चा बँकांकडे वळवला आहे. 

Updated: Nov 17, 2022, 09:10 AM IST
Bank News : आजपासून 'ही' बँक पूर्णत: Private; सरकारला कोट्यवधींचा नफा  title=
Government Got whooping amount of rupees 3839 crore post selling Axis Bank Share

Axis Bank Share Sale: मागील काही दिवसांपासून (Air India) एअर इंडियासह अनेक संस्थांचं खासगीकरण करणाऱ्या केंद्र सरकारनं आता आपला मोर्चा बँकांकडे वळवला आहे. सध्याच्या घडीला सरकारकडून (IDBI Bank) आयडीबीआय बँकची भागिदारी विकण्याच्या तयारीत आहेत. पण, तत्पूर्वी अॅक्सिस बँकेतील (Axis Bank) आपली 1.5 टक्के भागिदारी विकत सरकारनं मोठं पाऊल उचललं आहे. या व्यवहारातून सरकारी तिजोरीमध्ये तब्बल 3839 कोटी रुपयांची भर पडली आहे. केंद्राची ही भागिदारी स्पेसिफाइड अंडरटेकिंग ऑफ द यूनिट ट्रस्ट ऑफ इंडिया (SUUTI) च्या माध्यमातून शक्य झाली होती. 

प्रति शेअर फ्लोअर प्राईज किती? 

दीपम (DIPAM) सचिव तुहीन कांत पांडे यांनी ट्विट करत यासंदर्भातील माहिती दिली. मागील आठवड्यात झालेल्या या व्यवहारामध्ये सरकारनं एसयूयूटीआयच्या माध्यमातून 1.5 टक्के भागिदारी विकली. ऑफर फॉर सेलच्या माध्यमातून विकण्यात आलेल्या या शेअर्सना प्रती शेअर  830.63 रुपये इतकी फ्लोअर प्राईज मिळाली. थोडक्यात या व्यवहारातून सरकारला 3,839 कोटी रुपये मिळाले. 

वाचा : Post Office ने आणली जबरदस्त योजना! एका वर्षात बँकेपेक्षा जास्त फायदा

सरकारच्या तिजोरीत आतापर्यंत किती रक्कम? 

एसयूयूटीआय (SUUTI)च्या माध्यमातून भागिदारी विकत केंद्रानं आतापर्यंत 28,383 कोटी रुपयांचा परतावा मिळवला आहे. चालू आर्थिक वर्षात 2022-23 या माध्यमातून तब्बल 65 हजार कोटी रुपये मिळवण्याचं सरकारचं लक्ष्य असल्याचं कळत आहे. सदर व्यवहारानंतर आता अॅक्सिस बँकेत असणारी सरकारची भागिदारी संपुष्टात आली आहे. फाईलिंगनुसार विक्री OFS द्वारे ब्लॉक डीलमध्ये करण्यात आली. 10 आणि 11 नोव्हेंबरला हा संपूर्ण व्यवहार पार पडला.