Post Office ने आणली जबरदस्त योजना! एका वर्षात बँकेपेक्षा जास्त फायदा

Post Office Fixed Deposit: पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करुन तुम्ही सुरक्षित आणि चांगला फायदा मिळवू शकता. पोस्ट ऑफिसमध्ये एफडीकरुन (Post office fixed deposit) तुम्हाला अनेक प्रकारच्या सुविधाही मिळतात. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे यात तुम्हाला सरकारी हमीही मिळते.

Updated: Nov 17, 2022, 09:41 AM IST
Post Office ने आणली जबरदस्त योजना! एका वर्षात बँकेपेक्षा जास्त फायदा title=

Post Office Scheme: प्रत्येकाला सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय हवा असतो. कारण आयुष्यभराची पुंजी वाया जाऊ नये म्हणून ते सुरक्षित गंतवणुकीला प्राधान्य देतात. पोस्टात केलेली गुंतवणूक केव्हाही चांगली ठरते. तुम्हालाही गुंतवणूक करायची असेल पण शेअर बाजाराच्या जोखमीची भीती वाटत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयोगी आहे. आज आम्ही तुम्हाला अशा सुरक्षित गुंतवणुकीबद्दल सांगणार आहोत, जिथे तुम्हाला सुरक्षित फायदा मिळेल. तुम्ही पोस्ट ऑफिसच्या मुदत ठेव योजनेत (Fixed deposit) गुंतवणूक करु शकता. पोस्ट ऑफिसमध्ये एफडी (Post office fixed deposit) घेतल्यावर तुम्हाला व्याजासह इतर अनेक सुविधा मिळतात. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे फायद्यासोबतच सरकारी हमीही मिळणार आहे. यामध्ये तुम्हाला व्याजाची सुविधा (Post Office FD Interest Rate) तिमाही आधारावर मिळते. जाणून घेऊया सविस्तर.

(अधिक वाचा - Mhada : म्हाडाचा मोठा निर्णय, आता घरं बुकींगसाठी Deposit किती असणार?)

Post Office FD योजना 

ऑफिसमध्ये एफडी करणे खूप सोपे आहे. (Post Office FD) इंडिया पोस्टच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, पोस्ट ऑफिसमध्ये तुम्ही वेगवेगळ्या  1,2, 3, 5 वर्षांसाठी FD मिळवू शकता. या योजनेत कोणते फायदे उपलब्ध आहेत ते जाणून घेऊया. 

1. भारत सरकार तुम्हाला Post Office FD मध्ये हमी देते.
2. यामध्ये तुमचे पैसे पूर्णपणे सुरक्षित आहेत.
3. यामध्ये ऑफलाइन (रोख, चेक) किंवा ऑनलाइन (नेट बँकिंग/मोबाइल बँकिंग) द्वारे एफडी करता येते.
4. तुम्हाला हवे असल्यास 1 पेक्षा जास्त FD ठेवू शकता.
5. तुम्ही यामध्ये FD खाते जॉईन करू शकता.
6. 5 वर्षांसाठी फिक्स डिपॉझिट केल्यावर, तुम्हाला ITR भरताना कर सूट मिळेल.
7. तुम्ही एका पोस्ट ऑफिसमधून दुसऱ्या पोस्ट ऑफिसमध्ये सहजपणे एफडी ट्रान्सफर करु शकता. 

अशा प्रकारे Post Office FD उघडा

Post Office FD या योजनेचा लाभ कसा घेऊ शकता याबद्दल जाणून घ्या. पोस्ट ऑफिसमध्ये एफडी घेण्यासाठी तुम्ही चेक किंवा रोख देऊन खाते उघडू शकता. यामध्ये, किमान 1000 रुपयांसह खाती उघडली जातात आणि जास्तीत जास्त रक्कम जमा करण्यासाठी कोणतीही मर्यादा नाही. म्हणजेच तुम्ही तुमच्या सोयीनुसार रक्कम निश्चित करू शकता.

या ठिकाणी मिळेल चांगले व्याज

 पोस्ट ऑफिसच्या या स्कीममध्ये तुम्हाला चांगला फायद्याबरोबच परताना मिळेल. या अंतर्गत 7 दिवस ते एक वर्षाच्या FD वर 5.50 टक्के व्याज मिळते.
- 1 वर्ष, 1 दिवस ते 2 वर्षांच्या FD वर समान व्याजदर लागू आहे.
- 3 वर्षांपर्यंतच्या FD वर 5.50 टक्के दराने व्याज देखील उपलब्ध आहे.
- 3 वर्षांच्या एका दिवसापासून 5 वर्षांपर्यंतच्या FD वर 6.70 टक्के व्याज मिळते.

 

(Disclaimer: कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. ZEE 24 TAAS तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला देत नाही.)