'या' स्ट्रिममधून पदवीधर असाल तर मिळेल गुगलमध्ये नोकरी

 गुगल हे जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन आहे. इंटरनेटवरील सर्वाधिक युजर्स हे गुगलचाच वापर करत आहेत.  त्यामुळे गुगलची कमाई अनेकपटींने वाढली आहे. कामाचा व्याप वाढल्याने जगभरातील असंख्यजणांना गुगलच्या माध्यमातून नोकरी मिळाली आहे.  गुगल जॉब या आपल्या अधिकृत सेक्शनमध्ये गुगल नेहमी जॉब संदर्भातील माहिती देत असते. 

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Aug 9, 2017, 05:25 PM IST
'या' स्ट्रिममधून पदवीधर असाल तर मिळेल गुगलमध्ये नोकरी title=

मुंबई :  गुगल हे जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन आहे. इंटरनेटवरील सर्वाधिक युजर्स हे गुगलचाच वापर करत आहेत.  त्यामुळे गुगलची कमाई अनेकपटींने वाढली आहे. कामाचा व्याप वाढल्याने जगभरातील असंख्यजणांना गुगलच्या माध्यमातून नोकरी मिळाली आहे.  गुगल जॉब या आपल्या अधिकृत सेक्शनमध्ये गुगल नेहमी जॉब संदर्भातील माहिती देत असते. 
 जगातील टॉप कंपनी असलेल्या गुगलने इंजिनीअरींग प्रोग्राम मॅनेजरची जागा रिक्त आहे. हा हाय प्रोफाईल जॉब आहे. त्याप्रमाणेच या ठिकाणी व्यक्तीची नेमणूक होणार आहे. परिक्षेतून निवडले गेलेले उमेदवाराला एकावेळेस वेगवेगळ्या प्रकारच्या कामांचा अनुभव मिळणार आहे. निवड झालेले उमेदवार प्रोजेक्ट सुरुवात करण्यापासून टीम मॅनजमेंटच्या सर्व बाबी संभाळणार आहेत.

यासाठी काय आहे पात्रता ?

गुगल जॉब्समध्ये सांगितलेल्या या वॅकेन्सीमध्ये त्यांनी यासाठीची पात्रताही सांगितली आहे. त्यानुसार बीए किंवा बीएस ची डिग्री असलेल्यांना यामध्ये खुप मोठी संधी आहे.  या क्षेत्रातील
 १० वर्षाचा अनुभव असणेही गरजेचे आहे. तसेच सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आणि कम्प्युटर सायन्सचा अनुभव असणे गरजेचे आहे.

अधिक माहितीसाठी...

careers.google.com यावर जॉब संदर्भात अधिक माहिती तुम्हाला मिळणार आहे.