रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! मोदी सरकारकडून 78 दिवसांच्या बोनसची घोषणा

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारची मोठी घोषणा

Updated: Sep 19, 2019, 03:27 PM IST
रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! मोदी सरकारकडून 78 दिवसांच्या बोनसची घोषणा title=

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी घेण्यात आलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला. बैठकीदरम्यान, 11 लाखहून अधिक रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांचा पगार बोनस म्हणून देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. 

माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी रेल्वे कर्मचाऱ्यांना बोनसची ही रक्कम पगाराप्रमाणेच दिली जाणार असल्याचे सांगितले. 

रेल्वे कर्मचाऱ्यांच्या बोनससाठी, सरकार जवळपास 2024 कोटी रुपये खर्च करणार आहे. सलग सहाव्या वर्षी सरकारकडून बोनसची घोषणा करण्यात आली आहे. 

बोनस देण्यामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांची काम करण्याची क्षमता वाढेल, असा सरकारला विश्वास आहे. सध्या भारतीय रेल्वेमध्ये जवळपास 11.51 लाख कर्मचारी काम करतात. बोनसच्या या निर्णयाचा फायदा सर्वांनाच मिळणार आहे.