पणजी : आतंरराष्ट्रीय पर्यटन स्थळ असणारा गोवा 'चिल आऊट डेस्टिनेशन' म्हणून प्रसिद्ध आहे. मात्र आता गोव्यात दारू पिऊन गाडी चालविण्याऱ्या तळीरामांविरोधात वाहतूक विभागानं मोहीम उघडलीय. गोवा पोलिसांनी नवा पर्यटन हंगाम सुरू होण्यापूर्वीच विशेष अभियान सुरू केलंय.
शहरातील मोक्याच्या ठिकाणी वाहतूक पोलीस अल्कोमीटरच्या सहाय्याने चाचणी करताहेत. संध्याकाळी ७ ते रात्री १० पर्यंत ही मोहीम सुरू असेल.
या कारवाईत दोषी आढळल्यास वाहन जप्त केलं जाणार असून त्यांना न्यायालयात उभं केलं जाणार आहे. यामुळे अपघाताचे प्रमाण कमी होईल, असा विश्वास पोलिसांना वाटतोय.