Babymoon: धोक्यात आलेल्या नात्याला 'बेबीमून' देणार संजीवनी, जाणून घ्या काय आहे ही कन्सेप्ट

काही काळानंतर मुलबाळ झाल्यानंतर जबाबदाऱ्या वाढतात. अशात कपल्सला एकमेकांना हवा तेवढा वेळ देता येत नाही.

Updated: Aug 25, 2022, 07:44 PM IST
Babymoon: धोक्यात आलेल्या नात्याला 'बेबीमून' देणार संजीवनी, जाणून घ्या काय आहे ही कन्सेप्ट title=

Relationship tips after having baby: लग्नानंतर सुरवातीचे दिवस नव्या नात्यातले सोनेरी दिवस असतात. यामध्ये कपल्स एकमेकांकडे लक्ष देतात, एकमेकांना हवा तो वेळ दिला जातो. मात्र, काही काळानंतर मुलबाळ झाल्यानंतर जबाबदाऱ्या वाढतात. अशात कपल्सला एकमेकांना हवा तेवढा वेळ देता येत नाही. एकमेकांना पुरेसा वेळ न दिल्याने नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो. अशात तुमचं नातंही पणाला लागू शकतं. चला तर मग जाणून घेऊयात तुमच्या आणि तुमच्या पार्टनरमधील दुरावा कसा कमी केला जाऊ शकतो. 

नात्यातील दुरावा कमी करण्यासाठी काय कराल?

एकदुसऱ्यासाठी वेळ काढा :

मुलबाळ झाल्यानंतर कपाळमधील एकमेकांना दिला जाणारा वेळ आपसूक कमी होतो. मात्र, बाळ झाल्यानंतरही एकमेकांमध्ये अंतर पडू देऊ नका. एकदुसऱ्यासाठी थोडा वेळ नक्की काढा. तुमचं बाळ झोपलं की तुम्ही एकमेकांना वेळ देऊ शकतात.कोणत्याही रिलेशनशिपमध्ये एकमेकांना योग्य वेळ दिला गेला नाही तर तणाव निर्माण होऊ शकतो. एकमेकांसोबत खटके उडू शकतात. म्हणून बाळ झाल्यानंतरही एकदुसऱ्यासाठी मुद्दाम वेळ काढा. 

वेळ काढून फिरायला जा 

हनीमूनसारखं आजकल बेबीमूनही (Babymoon) चांगलंच प्रसिद्ध होत चाललंय. हा एक असा शॉर्ट ब्रेक असतो जो कपल्स मुलं झाल्यानंतर घेतात. मुलबाळ झाल्यानंतर कपल्सना एकमेकांना हवा तेवढा वेळ देता येत नाही. म्हणून खास एकमेकांना वेळ देण्यासाठी बेबीमून ही कॉन्सेप्ट पुढे येताना पाहायला मिळते आहे. यामुळे कपल्स आपला मूड फ्रेश करू शकतात