Good News: ट्रेनमध्ये व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून मागवा आवडीचे पदार्थ, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून आवडीचे पदार्थ आपल्या कोचमध्ये मागवता येणार आहे. यासाठी व्हॉट्सअ‍ॅपवर एक मेसेज करावा लागेल.

Updated: Aug 25, 2022, 07:32 PM IST
Good News: ट्रेनमध्ये व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून मागवा आवडीचे पदार्थ, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया title=

Railway Whatsapp Zoop Order: रेल्वेतून लांबचा प्रवास करताना आवडीचे पदार्थ मागवताना प्रवाशांना अडचणीचा सामना करावा लागतो. कधी कधी उपाशी पोटी प्रवास करावा लागतो. आता रेल्वेनं यासाठी एक योजना तयार केली आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून आवडीचे पदार्थ आपल्या कोचमध्ये मागवता येणार आहे. यासाठी व्हॉट्सअ‍ॅपवर एक मेसेज करावा लागेल. आयआरसीटीसीच्या फूड डिलीव्हरी सर्व्हिस Zoop ने प्रवाशांना व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉट सर्व्हिस देण्यासाठी Jio Haptik सोबत भागीदारी केली आहे. प्रवाशी प्रवास करताना फक्त पीएनआर नंबर वापरून आपल्या जागेवर आवडीचे पदार्थ मागवू शकतात. यासाठी कोणतंही अ‍ॅप डाउनलोड करण्याची आवश्यकता नाही.

व्हॉट्सअ‍ॅपद्वारे कोणत्याही पुढच्या स्टेशनवर जेवण ऑर्डर करण्यासाठी Zoop वापरू शकता. व्हॉट्सअ‍ॅपवर युजर्स रिअल-टाइम फूड ट्रॅकिंग देखील करू शकतात तसेच फीडबॅक देऊ शकतात. तसेच ऑर्डरशी संबंधित माहिती मिळवू शकतात. या सुविधेमुळे प्रवाशांना रेल्वे पँट्री आणि अन्य विक्रेत्यांवर अवलंबून राहण्याची गरज नाही. चला तर जाणून घेऊयात व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून रेल्वेत आवडीचे पदार्थ ऑर्डर करू शकता.

  • Zoop चॅटबॉट नंबर +91 7042062070 मोबाईलमध्ये सेव्ह करा. जेव्हा तुम्हाला ऑर्डर करायची असेल तेव्हा व्हॉट्सअ‍ॅपवरून चॅट करू शकता. तसेच Zoop सोबत चॅट करण्यासाठी तुम्ही https://wa.me/917042062070 नेव्हिगेट करू शकता.
  • आता व्हॉट्सअ‍ॅपवर Zoop क्रमांकावर फक्त 'Hi' टाइप करून Send करा.
  • त्यानंतर तुम्हाला Zoop कडून एक रिप्लाय मिळेल. त्यात तुम्हाला काय हवं असं विचारलं जाईल? पीएनआर स्टेटस आणि ट्रॅक ऑर्डर असे पर्याय मिळतील.
  • जर तुम्हाला जेवण मागवायचे असेल तर तुम्हाला Order a Food या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • ऑर्डर अ फूडवर क्लिक केल्यानंतर आपला 10 अंकी पीएनआर नंबर द्यावा लागेल.
  • त्यानंतर पीएनआर आणि अन्य डिटेल्सची पुष्टी करण्यास सांगितलं जाईल.
  • ही सर्व माहिती दिल्यानंतर आपल्याला ऑर्डर ज्या ठिकाणी हवी आहे ते स्टेशन निवडण्यास सांगितलं जाईल. त्यानंतर त्या स्टेशनजवळील हॉटेल निवडावं लागेल.
  • हॉटेल निवडल्यानंतर हॉटेलच्या मेन्यूतून आवडती डिश निवडावी लागेल. एकदा तुम्ही ऑर्डर दिल्यानंतर, तुम्हाला तुमच्या ऑर्डरचा तपशील मिळेल .
  • त्यानंतर तुम्हाला पेमेंट करण्यासाठी पुढे जावे लागेल. तुम्ही UPI, नेटबँकिंग इत्यादी सेवेद्वारे पेमेंट करू शकता. त्यानंतर आपली ऑर्डर त्या ठिकाणी पोहोचेल.