मुंबई : माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांची अचानक तब्बेत बिघडल्यामुळे त्यांनी रूग्णालयात दाखल करण्यात आलं. दिल्लीच्या AIIMS रूग्णालयात मनमोहन सिंह यांना दाखल करण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार संध्याकाळी ८ वाजून ४५ मिनिटांनी मनमोहन सिंह यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं. AIIMS च्या कार्डियक न्यूरो सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं. अचानक छातीत दुखू लागल्यामुळे त्यांना तात्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आलं.
Delhi: Former Prime Minister Dr Manmohan Singh has been admitted to All India Institute of Medical Sciences (AIIMS) after complaining about chest pain (File pic) pic.twitter.com/a38ajJDNQP
— ANI (@ANI) May 10, 2020
मनमोहन सिंह यांच्या छातीत अचानक दुखू लागल्यामुळे त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं. मनमोहन सिंह यांच्या तब्बेतीची माहिती मिळताच अनेकांनी ट्विटरवरून त्यांची आरोग्यासाठी प्रार्थना केली. भाजप प्रवक्ता संबित पात्राने लवकर बरं होण्यासाठी प्रार्थना केली आहे. ट्विट करून सगळ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
Praying for his quick recovery
Get well soon Sir ... https://t.co/qIX1MTBaSy— Sambit Patra (@sambitswaraj) May 10, 2020
अनेक नेत्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. डॉ. मनमोहन सिंह हे भारताचे १३ वे पंतप्रधान आहेत. ज्यांचा कार्यकाल हा २००४ ते २०१४ इतका राहिला आहे. डॉ. मनमोहन सिंह हे अर्थतज्ज्ञ आहेत. तसेच ते रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गवर्नर देखील होते.