मोदी चूक सुधारत नाहीत, केवळ नेहरुंना जबाबदार धरत आहेत - मनमोहन सिंह

Manmohan Singh on PM Narendra Modi : माजी पंतप्रधान मनमोहन सिंह (Manmohan Singh) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर निशाणा साधला आहे. मोदी हे चूक सुधारण्याऐवजी पंडित नेहरु यांना जबाबदार धरत आहेत.  

Updated: Feb 17, 2022, 03:28 PM IST
मोदी चूक सुधारत नाहीत, केवळ नेहरुंना जबाबदार धरत आहेत - मनमोहन सिंह title=

पंजाब : Manmohan Singh on PM Narendra Modi : माजी पंतप्रधान मनमोहन सिंह (Manmohan Singh) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर निशाणा साधला आहे. मोदी हे चूक सुधारण्याऐवजी पंडित नेहरु यांना जबाबदार धरत आहेत. ते चुका सुधारत नाहीत, असे थेट आरोप त्यांनी केला आहे. पंजाबच्या जनतेला मनमोहन सिंह यांनी व्हिडिओच्या माध्यमातून संदेश दिला आहे. त्यावेळी ही टीका केली. (Former PM and Congress leader Manmohan Singh Criticism of PM Narendra Modi)

पंजाब विधानसभा निवडणुकीचा (Punjab Elections 2022) प्रचार जोरात सुरु आहे. निवडणुकीच्या या रणधुमाळीत त्यांनी मोदींवर टीका केली आहे. भाजप आणि काँग्रेसकडून आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत. आता यामध्ये माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी उडी घेतली आहे. त्यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. मनमोहन सिंह म्हणाले की, चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे बेरोजगारी आज शिखरावर आहे. विद्यार्थी, महिला, व्यापारी सर्वच नाराज आहेत. देशाचा अन्नदाता संकटात आहे.

मनमोहन सिंह म्हणाले की, केंद्र सरकार आपल्या साडेसात वर्षांच्या चुका सुधारण्याऐवजी देशाचे पहिले पंतप्रधान नेहरूंवर दोषारोप करण्यात व्यस्त आहे. पंतप्रधान पदाला विशेष महत्त्व आहे, असे माझे स्पष्ट मत आहे. फक्त इतिहासाला दोष देऊन त्यांचे दोष कमी होऊ शकत नाहीत.

10 वर्षे बोलण्याऐवजी कामे केली

मी,10 वर्षे पंतप्रधान म्हणून बोलण्याऐवजी माझ्या कामावर लक्ष केंद्रित केले. माझ्या राजकीय फायद्यासाठी मी कधीही देशाचे विभाजन केले नाही. देशाचा आणि पदाचा अभिमान कमी होऊ दिला नाही. आव्हाने असतानाही नेहमीच देशाची मान उंचावली आहे, असा टोला मोदी यांना मनमोहन सिंह यांनी लगावला. मी बोलण्याऐवजी कामांवर भर दिल्याचे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले, मोठमोठ्या गोष्टी बोलणे सोपे असते. पण त्या अंमलात आणणे खूप अवघड असते. केंद्र सरकारने हे देखील समजून घेतले पाहिजे की, चेहरा बदलल्याने स्थिती बदलत नाही, जे काही खरे आहे ते नेहमीच कोणत्या ना कोणत्या स्वरूपात बाहेर येतेच!