Indian Railway Ticket : देशामध्ये सर्वात स्वस्त प्रवास अशी ओळख असणारा प्रवास म्हणजे रेल्वेचा प्रवास. त्यामुळे रस्तेवाहतुकीऐवजी अनेकांची पहिली पसंती ही रल्वे प्रवासालाच असते. असं असलं तरी, रेल्वे तिकीट कंफर्म झालं नाही तर नियोजित कार्यक्रमासाठी अडचण निर्माण होते. पण या अडचणीवर मात करण्यासाठी आम्ही एक ट्रिक सांगणार आहोत. IRCTC च्या माध्यमातून तुमचं तिकीट तुम्ही कंफर्म करु शकता. काय आहे ही ट्रिक जाणून घ्या.
1. IRCTC च्या अधिकृत वेबसाईटवर लॉगिन करा.
2. वेबसाईटवरील My Profile या पर्याय सिलेक्ट करा.
3. यानंतर मास्टर लिस्ट तयार करा. ही मास्टर लिस्ट तयार करण्यासाठी सांगितलेली माहिती भरा.
4. तात्काळ तिकीट बूक करताना वेळेची विशेष काळजी घ्यावी. ( AC तिकीट बूक करण्यासाठी सकाळी 10 वाजता तर स्लिपर क्सास बूकिंग सकाळी 11 वाजता सुरु होते.)
5. बूकिंग सुरु होण्याआधी किमान 2 मिनिटे तुम्ही मास्टर लिस्टमध्ये माहिती भरा. ज्यामुळे तात्काळ तिकीट उघडताच तुम्हाला फक्त मास्टर लिस्टची निवड करावी लागेल.
6. लॉगिननंतर तुम्हाला शेवटचा पर्याय म्हणून पेमेंटचा पर्याय दिसेल. (क्रेडिट/डेबिट कार्ड किंवा UPI द्वारे पेमेंट करू शकता.) तुम्ही नेट बँकिंगद्वारे देखील पेमेंट करु शकता.
7. पण लवकर पेमेंट व्हावं म्हणून UPI आयडी आधीच सिलेक्ट करुन ठेवा.
8. ही प्रक्रिया लवकरात लवकर करायला हवी, कारण तात्काळ तिकीट बुकिंग लवकर बंद होत असते.