नवी दिल्ली : भारतात कोरोना व्हायरसच्या पहिल्या संशयिताचा बळी गेल्याची माहिती मिळत आहे. 'पीटीआय' या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, कर्नाटकमधील ७६ वर्षीय स्थानिक कोरोना व्हायरस संशयित व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा रुग्ण दुबईहून कर्नाटकात परतला होता. दरम्यान, केंद्रीय आरोग्या मंत्रालयाने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
A 76-year-old man suspected to be infected with coronavirus dies in Karnataka's Kalaburagi: Government
— Press Trust of India (@PTI_News) March 11, 2020
कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रकरणांमुळे केंद्र सरकारने मंगळवारी, फ्रान्स, जर्मनी आणि स्पेनमधील नागरिकांचा व्हिसा तात्पुरता रद्द केला आहे. या देशातील नागरिकांना सध्या भारतात प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे. भारतात कोरोना व्हायरसची जवळपास ५० पॉझिटिव्ह प्रकरणं समोर आली आहेत. यापैकी ३४ भारतीय असून १६ इटलीचे नागरिक आहेत.
दरम्यान, भारतात कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत एकही मृत्यू झाला नसल्याचं आरोग्य मंत्र्यांकडून सांगण्यात आलं आहे.