वडिलांचा पहिला विमानप्रवास मुलाने कॅमेरात केला कैद; पाहा हृदयस्पर्शी Video

आयुष्यभर काबाडकष्ट करुन आपल्या मुलांना सुखाचं आयुष्य जगता यावं यासाठी त्यांचे पालक कायमच धडपड करत असतात. एखाद्या वडिलांसाठी सर्वात अभिमानाची गोष्ट म्हणजे त्यांची मुले त्यांच्या पायावर उभी राहतात. वडिलांसाठी सर्वात अभिमानाची गोष्ट म्हणजे जेव्हा त्यांना खात्री असते की आपला मुलगा त्याच्या स्वत: च्या कतृत्वापेक्षा जास्त करत आहे. अशाच एका पित्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. आपल्या वडिलांना हेवा वाटेल असं काहीसं काम एका मुलाने केलं आहे. त्याचाच हा व्हिडीओ आहे.

आकाश नेटके | Updated: May 12, 2023, 07:07 PM IST
वडिलांचा पहिला विमानप्रवास मुलाने कॅमेरात केला कैद; पाहा हृदयस्पर्शी Video title=

Viral Video : आयुष्यभर काबाडकष्ट करुन आपल्या मुलांना सुखाचं आयुष्य जगता यावं यासाठी त्यांचे पालक कायमच धडपड करत असतात. एखाद्या वडिलांसाठी सर्वात अभिमानाची गोष्ट म्हणजे त्यांची मुले त्यांच्या पायावर उभी राहतात. वडिलांसाठी सर्वात अभिमानाची गोष्ट म्हणजे जेव्हा त्यांना खात्री असते की आपला मुलगा त्याच्या स्वत: च्या कतृत्वापेक्षा जास्त करत आहे. अशाच एका पित्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. आपल्या वडिलांना हेवा वाटेल असं काहीसं काम एका मुलाने केलं आहे. त्याचाच हा व्हिडीओ आहे.

नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा हृदयस्पर्शी व्हिडिओ सर्वांचेच लक्ष्य वेधून घेत आहे. एका मुलाने आपल्या वडिलांना मुंबईला जाणाऱ्या पहिल्या फ्लाइटमध्ये कसे नेले हे दाखवणारा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. विमानात चढताना वडिलांची अनमोल प्रतिक्रिया भावूक करणारी आणि कधीही न विसरता येणारी आहे.

इंस्टाग्राम युजर जतिन लांबा याने काही दिवसांपूर्वी त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. व्हिडीओमध्ये जतिनचे वडील विमानात बसताना दिसत आहेत. व्हिडिओ शेअर करताना जतिनने, जेव्हा तुम्हाला मुलगा असल्याचा अभिमान वाटतो!' असे कॅप्शन दिले आहे. हा प्रवास दिल्ली ते मुंबई असा होता. जतीनने सांगितले की, त्याने कमावलेल्या पैशाने वडिलांना पहिल्यांदा विमान बसायला मिळाले आहे.

व्हिडिओमध्ये जतीनचे वडील त्यांच्या फ्लाइटच्या बाल्कनीतून दिसणारे दृश्य पाहून हसत आहेत. एका ठिकाणी ते विमानतळावर बसून काहीतरी खाताना दिसत आहे. त्यामध्ये दोघेही खूप खुश असल्याचे दिसत आहेत. मुलगा आपल्या वडिलांना पाहून आनंदी आहेत.

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

गेल्या महिन्यात जतीन वडिलांना विमानाने घेऊन गेला होता. या व्हिडिओला 1 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर अनेकांनी कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने म्हणूनच मी माझे इंटरनेट बिल भरले, माझा दिवस आनंदी झाला, धन्यवाद," अशी प्रतिक्रिया एका युजरने दिली आहे. तर दुसऱ्या एका युजरने,  मित्रा, तू आयुष्यात जिंकलास. मला माझ्या आई आणि बाबांसाठी हेच करायचे आहे, असे म्हटलं आहे.

दरम्यान, आई-वडिलांचे नाव उज्ज्वल करणे, त्यांच्यासाठी असे काहीतरी करणे हे प्रत्येक मुलाचे स्वप्न असते जेणेकरून त्यांना अभिमान वाटेल. पालकांना त्यांच्या मुलांकडून कधीही काहीही नको असते, ते निस्वार्थपणे प्रेम करतात, म्हणून जेव्हा जेव्हा तुम्ही पालकांसाठी काहीतरी करण्यास सक्षम होणार असाल तर अशी संधी गमावू नका.