गाझियाबाद : भारतीय किसान युनियन (BKU) च्या समर्थकांनी शुक्रवारी पुन्हा एकदा दिल्ली-मेरठ द्रुतगती मार्गावर (Delhi Border) जमण्यास सुरुवात केली. यामुळे शेतकरी आंदोलकांची (Farmers) तेथे मोठी गर्दी जमली आहे. मात्र, गाझियाबाद प्रशासनाने यूपीच्या गेटमधून निदर्शकांना (Farmers Protest) हटवण्यासाठी अल्टिमेटम दिला आहे. येथे मोठ्या संख्येने सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
याशिवाय केंद्र सरकारच्या 66 व्या दिवशी दिल्ली-हरियाणा सीमेवर शेतकऱ्यांचा (Farmers Protest) निषेध सुरू आहे. त्याचवेळी दिल्लीच्या सिंघू सीमेवरील शेतकर्यांचे निदर्शने सुरुच आहेत. येथे शेतकरी आंदोलक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. निषेधाच्या पार्श्वभूमीवर सीमेवर मोठ्या प्रमाणात पोलीस कर्मचारी आणि सुरक्षा दलांना तैनात करण्यात आले आहे.
आता अधिक शेतकरी दिल्लीच्या सीमेवर पोहोचत आहेत.भारतीय किसान युनियनच्या आवाहनानुसार पश्चिम उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) बागपत, बिजनौर, मेरठ, मुरादाबाद, मुझफ्फरनगर आणि बुलंदशहर जिल्ह्यातून अधिक शेतकरी आंदोलनात सहभागी होण्यासाठी यूपी गेटवर पोहोचले आहेत.
Heavy security deployment continues at Singhu on Delhi-Haryana border where farmers' protest against three agriculture laws enters Day 66. pic.twitter.com/O6m2GRtzxq
— ANI (@ANI) January 30, 2021
यूपीच्या गेटवर संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली होती.विशेष म्हणजे, गुरुवारी संध्याकाळी आंदोलन ठिकाणी सतत वीज तोडण्यात येत असताना, यूपी गेटवरील गाजीपुरात संघर्ष होण्याची शक्यता आहे. गाझीपुरात भारतीय किसान युनियनचे शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्या नेतृत्वात 28 नोव्हेंबर 2020 पासून धरणे आंदोलन केले आहे.
गाझियाबादचे डीएम अजय शंकर पांडे आणि एसएसपी कलानिथी नैथानी मध्यरात्रीनंतर आंदोलन स्थळी भेट देण्यासाठी आणि परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी दाखल झाले. सध्या घटनास्थळी सुरक्षा दल तैनात आहेत. पोलिस उपअधीक्षक अंशु जैन यांनी सांगितले की, सुरक्षा दलाचे सुमारे तीन हजार जवान तैनात केले आहेत. राज्य सशस्त्र सेना व्यतिरिक्त रॅपिड अॅक्शन फोर्स आणि सिव्हिल पोलीस कर्मचारी यांचा समावेश आहे. हे सैनिक गाझीपूरच्या आसपास तैनात केले आहेत.