नवी दिल्ली : केंद्रीय अर्थसंकल्पाला (Budget 2021) शुक्रवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ramnath Kovind) यांच्या अभिषेकाचे सुरुवात झाली. या दरम्यानच्या काळात मिळालेल्या माहितीनुसार बजेट सादर होण्याच्यावेळी एक ऐतिहासिक बदल पाहायला मिळणार आहे. अर्थसंकल्प सादर होताना लोकसभा सदस्यांना मिळणारे जेवण उत्तर रेल्वेकडून (Northern Railways) देण्यात येणार नाही. 52 वर्षांपासून उत्तर रेल्वेकडून जेवण मिळत होते. यात आता खंड पडणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार 1 फेब्रुवारी रोजी सादर होणारा केंद्रीय अर्थसंकल्प ((Union Budget) दरम्यान, भारत पर्यटन विकास निगमच्यावतीने (India Tourism Development Corporation) खासदारांना भोजन दिले जाणार आहे. हे जेवण 5 स्टार अशोक हॉटेलचे स्वयंपाकी करणार आहेत. या जेवणावर सबसिडी मिळणार आहे. त्यामुळे 5 स्टार हॉटेलचे दर लागणार नाहीत. पंचतारांकित जेवण संसदेतील कँटीगप्रमाणे स्वस्त किमतीत उपलब्ध होणार आहे.
खासदारांना या दरात मिळणार थालीखासदारांसाठी शाकाहारी थाळीची (vegetarian platter) किंमत 100 रुपये आहे. कढई पनीर, मिक्स व्हेज ड्राई, भाजी, डाळ, मटर पुलाव, चपाती, काकडी, पुदीना रायता, पापड आणि काला जामtन यांचा समावेश आहे. तर मिनी शाकाहारी थाळी रुपये 50 असणार आहे. यात मिक्स व्हेज, सुखी, भाजी, डाळ सुलतानी, जीरा पुलाव, चपाती, सलडा, काकड़ी, पुदीना रायता आणि पापड यांचा समावेश असेल.
याशिवाय हॉटेलकडून खासदारांसाठी एक 'ए ला कार्टे' (A la carte) मेन्यू देखील असणार आहे. यात जेवणात 13 आयटम राहील. या मेन्यूमध्ये स्नॅक्सशिवाय 7 प्रकारच्या शाकाहारी भोजन असेल. मेनूमध्ये छोटी आणि मोठी थाली असणार आहे. स्नॅक्समध्ये 25 रुपयांत उपमा आणि 50 रुपयांत पनीर पकोडा, 10 रुपयांत समोसा आणि कचोरी याशिवाय अन्य खाण्याच्या वस्तू असतील.