मद्यपान करणारे किंवा न करणारे… दारूबद्दलच्या या गोष्टी तुम्हीला माहिती आहेत का?

दारूशी संबंधित काही अशा गोष्टी ज्या तुमच्यासाठी उपयुक्त ठरतील. याशिवाय काही अशा गोष्टी आहेत ज्या तुम्हाला अलर्ट करतील.

Updated: Jan 13, 2022, 12:29 PM IST
मद्यपान करणारे किंवा न करणारे… दारूबद्दलच्या या गोष्टी तुम्हीला माहिती आहेत का? title=

मुंबई : आपल्या सगळ्यांना तर हे माहित आहे की, मद्यपान केल्यामुळे नशा होते आणि ज्या पेयांमध्ये जास्त अल्कोहोल असते त्यातही नशाही तितकीच जास्त असते. परंतु याव्यतिरिक्त तुम्हाला दारुशी संबंध आणखी काही गोष्टी माहित आहे का? आम्ही दारुशी संबंधीत आज तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहोत, जे दारु पिणाऱ्या आणि न पिणाऱ्या लोकांना माहिती नसतील. उदाहरणार्थ, दारूचा वापर नशेव्यतिरिक्त, इतर अनेक गोष्टींसाठी देखील केला जातो, ज्या आपल्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. म्हणूनच, दारुंच्या या तथ्यांबद्दल जाणून घेणे खूप मनोरंजक आहे.

आज आम्ही दारूशी संबंधित काही गोष्टी सांगणार आहोत, त्यांपैकी काही तुमच्यासाठी उपयुक्त ठरतील. याशिवाय काही अशा गोष्टी देखील आहेत, ज्या तुम्हाला अलर्ट करतील की तुम्ही अल्कोहोलचे सेवन कसे आणि किती प्रमाणात करावे.

जाणून घ्या दारुबद्दल काही माहिती (facts about alcohol)

- मीडिया अहवालानुसार, NSDUH च्या आकडेवारीनुसार, 86.4 टक्के प्रौढांनी एकदा किंवा दोनदा अल्कोहोलचे सेवन केले आहे.

- महिलांपेक्षा पुरुष जास्त दारू पितात. विशेष बाब म्हणजे दारूमुळे महिला आणि पुरुष दोघांवरही वेगवेगळ्या प्रकारे परिणाम होतो, त्याचप्रमाणे दारूमुळे महिलांचे अल्पावधीतच खूप नुकसान होते.

- तसेच जगातील सर्वात स्ट्राँग बिअरमध्ये 67.5 टक्के अल्कोहोल असते. तर रेड वाईन, व्हिस्की सारख्या गडद लिकरमुळे हँगओव्हरची समस्या अधिक होते. तर व्हिस्कीचा वास घेऊनही चांगली झोप लागते.

- तुम्हाला हे माहित आहे का, की एक वाईनची बाटली बनवण्यासाठी किमान 600 द्राक्षे लागतात.

- मेंदूमध्ये डोपामाइन सोडण्यासह अल्कोहोलचे शरीरावर विविध प्रकारचे परिणाम होतात. यामुळे संयम आणि समाधानी राहण्याच्या सवयीवर परिणाम होतो.

- तुम्ही कधी वोडका गोठवण्याचा प्रयत्न केला आहे का? नसेल तर हे जाणून घ्या की वोडका सेट करण्यासाठी किंवा पूर्णपणे गोठवण्यासाठी उणे 16.51 फॅ डिग्री तापमान आवश्यक आहे.

- अनेक प्रकारचे अल्कोहोल औषधांमध्ये देखील वापरले जाते.

- रिकाम्या पोटी अल्कोहोल प्यायल्याने 3 पट जास्त नशा होते तर जेवणासोबत दारू पिल्याने नशा उशिरा येते.

- अल्कोहोलपासून दूर राहिल्यास कर्करोगाचा धोका ३०% कमी होऊ शकतो, असे म्हटले जाते.