Fact Check : छोट्या भावासाठी मोठा भाऊ बनला ढाल, सुपरमॅन बनून भावाला अलगद झेललं

या भावानं जे काम केलं ते पाहुन तुम्हीही या भावाचं कौतुक कराल. 

Updated: Aug 5, 2022, 12:03 AM IST
Fact Check : छोट्या भावासाठी मोठा भाऊ बनला ढाल, सुपरमॅन बनून भावाला अलगद झेललं title=

मुंबई : बातमी आहे एका धाडसी भावाची. भाऊ घराची स्वच्छता करत होता. त्याचवेळी अचानक दुसरा भाऊ घराच्या छतावरून खाली कोसळला. मग या भावानं जे काम केलं ते पाहुन तुम्हीही या भावाचं कौतुक कराल. असं काय केलं या भावानं. चला पाहुयात. (fact check viral polkhol brother catch and saved his video gose viral on social media)

भाऊ असावा तर असा. हे का म्हणतोय ते हा व्हीडिओ पाहिल्यानंतर कळेल. ही व्यक्ती पाण्याचा पाईप हातात घेऊन स्वच्छता करत होती. त्याचवेळी याचा भाऊ घरावरून खाली पडताना दिसतो. मग काय झालं पाहा. यानं हातातला पाण्याचा पाईप टाकून दिला. वरून खाली पडणाऱ्या भावाला अलगद झेललं.

बघा, कसा हा भावासाठी ढाल बनून उभा राहिला. भाऊ घरावरून खाली पडताना यानं त्याला झेललं. यावेळी दोघेही खाली कोसळले. पण, या भावानं स्वत:च्या भावाचा जीव वाचवलाय. आता पुन्हा एकदा पाहा. स्वत: जमिनीवर आपटला पण, भावाला त्यानं घट्ट पकडून ठेवलं. दोघेही खाली आपटल्यानं थोडंसं खरचटलं. पण, भावाचा जीव वाचला. हा भाऊ सुपरमॅनसारखा भावासाठी धावला आणि त्याला मृत्यूच्या तोंडातून बाहेर काढलं. या भावाच्या धाडसाचं कौतुक केलं जातंय.