Viral Polkhol : तुमच्याकडे एटीएम कार्ड (Atm Card) आहे का? जर एटीएम कार्ड असेल तर तुम्हाला मोफत अपघात विमा (Free Accident Insurance) मिळू शकतो. हे आम्ही म्हणत नाहीये, तर असा दावा करण्यात आलाय.त्यामुळे आम्ही या दाव्याची पोलखोल (Fact Check) केली. मग काय सत्य समोर आलं चला पाहुयात. (fact check viral polkhol bank gets accident insurance or life insurance to atm card holder)
दावा आहे की, तुमच्याकडे एटीएम कार्ड असेल आणि अपघाती मृत्यू झाला तर तुमच्या कुटुंबीयांना लाखो रुपये मिळतात. अशा आशयाचा एक मेसेज व्हायरल होतोय. हा मेसेज व्हायरल होत असल्याने याची पडताळणी करणं गरजेचं आहे. आजच्या घडीला प्रत्येकाकडे एटीएम कार्ड असतं. आणि या दाव्यात सत्यता असेल तर याचा फायदा होऊ शकतो. त्यामुळे आम्ही याची पडताळणी सुरू केली. पण, व्हायरल मेसेजमध्ये काय दावा केलाय ते पाहुयात.
बँकेने ग्राहकाला एटीएम कार्ड जारी करताच ग्राहकाला अपघाती विमा किंवा जीवन विमा मिळतो. अपघाती मृत्यू तसंच अपंगत्व आल्यास बँकेकडून पैसे मिळतात. मेसेज व्हायरल झाल्याने आम्ही याची पडताळणी करण्यासाठी बँक अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यावेळी त्यानी याबद्दल अधिक माहिती दिली.
प्रत्येक बँकाच्या एटीएम कार्डनुसार विमा असतो. व्हिसा, प्लॅटिनम, क्लासिक, रूपे मास्टर कार्ड असतात. अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास पैसे मिळतात. मृत्यूचं प्रमाणपत्र, हॉस्पिटलचं प्रमाणपत्र अशी कागदपत्र लागतात.
विम्याचे पैसे मिळवण्यासाठी नॉमिनीला अर्ज करावा लागतो. प्रत्येक बँक वेगवेगळ्या कागदपत्राची मागणी करते तेही द्यावे लागतात. तरच 50 हजार ते 2 लाख इतके पैसे मिळू शकतात. त्यामुळे आमच्या पडताळणीत एटीएम कार्ड धारकाचा अपघाती मृत्यू झाल्यास बैंक पैसे देते हा दावा सत्य ठरला.