विना Driving Test 7 दिवसात मिळेल Driving License

मोटार वाहन कायद्यानुसार (Motor Vehicles Act) 16-18 वयात ड्रायव्हिंग लायसन्स ठेवू शकता.  

Updated: Nov 23, 2022, 10:41 PM IST
विना Driving Test 7 दिवसात मिळेल Driving License title=

मुंबई : ड्रायव्हिंग लायसन्स (Driving License) बनवण्याच्या विचारात असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. लायसन्स काढण्यासाठी आरटीओमध्ये (Rto) ड्रायव्हिंग टेस्ट (Driving Test) द्यावी लागते. दररोज असंख्य जण ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करतात. मात्र ड्राईव्हिंग टेस्टमध्ये फेल होतात. मात्र आम्ही तुम्हाला अशा काही टीप्स सांगणार आहोत ज्याद्वारे ड्रायव्हिंग टेस्ट न देता लायसन्ससाठी अर्ज करु शकता. (know step by step how to online apply for driving license)

ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्याच्या नियमांमध्ये बदल होत असतात. मोटार वाहन कायद्यानुसार (Motor Vehicles Act) 16-18 वयात ड्रायव्हिंग लायसन्स ठेवू शकता. मात्र हे लायसन्स लर्निंग (Learning Licence) असतं. हे लर्निंग लायसन्स असेल तर तुम्ही विदाउट गियर (Without Gear) गाडी चालवू शकता. गिअर गाडीसाठी ड्रायव्हिंग लायसन्स अनिर्वाय असतं. यासाठी घर बसल्या ऑनलाईन लायसन्स कसं मिळवायचं हे जाणून घेऊयात.

असा करा अर्ज

लायसन्स मिळवण्यासाठी https://sarathi.parivahan.gov.in/sarathiservice/stateSelection.do या वेबसाईटवर जा. इथे आवश्यक माहिती आणि कागदपत्र दिल्यानंतर आरटीओकडून त्याची पडताळणी केली जाते. पडताळणीच्या 7 दिवसांनी ड्रायव्हिंग लायसन्स मिळतं. महत्त्वाची गोष्ट म्हणजे विना ड्रायव्हिंग टेस्ट फक्त लर्निंग लायसन्सच मिळतं. तसेच ड्रायव्हिंग टेस्ट दिल्यानंतरच्या पुढील काही दिवसात लायसन्स मिळतं. मात्र त्यासाठी अर्जदाराचं वय हे 18 पेशा जास्त असायला हवं.