Viral Messege : तुम्ही एटीएममधून (Atm) पैसे (Money) काढत असाल तर ही बातमी खूप महत्त्वाची आहे. एटीएममधून 4 वेळा पैसे काढल्यास तुमच्या खात्यातून 173 रुपये कट होणार 100 रुपये काढले तरीही एवढा चार्ज लागणार. हे आम्ही म्हणत नाहीये असा दावा करण्यात आलाय. त्यामुळे आम्ही याची पोलखोल केली. मग काय सत्य समोर आलं हे जाणून घेऊयात. (fact check viral polkhol 173 rupees will be deducted from the account after 4 transactions)
एटीएममधून तुम्ही वारंवार पैसे काढत असाल तर ही बातमी पाहा... कारण, तुम्हाला एटीएममधून पैसे काढणं महाग पडणाराय. 150 रुपये टॅक्स आणि 23 रुपये सर्व्हिस चार्ज आकारला जाणार आहे. हे आम्ही म्हणत नाहीये तर सोशल मीडियावर असा एक मेसेज व्हायरल होतोय. यात तसा दावा करण्यात आलाय प्रत्येकजण एटीएम वापरतो. त्यामुळे आम्ही या दाव्याची पोलखोल केली. पण. व्हायरल मेसेजमध्ये काय दावा केलाय ते पाहुयात.
एटीएममधून 4 पेक्षा अधिक वेळा पैसे काढल्यास प्रत्येक ट्रान्झॅक्शनला बँक खात्यातून 173 रुपये कापले जातात. 150 रुपये टॅक्स आणि 23 रुपये सर्विस चार्ज घेतला जाईल. हा मेसेज व्हायरल झाल्याने आमच्या व्हायरल पोलखोल टीमनं बँक अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. आणि त्यांच्याकडून व्हायरल मेसेजबाबत माहिती जाणून घेतली. त्यावेळी आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहा
प्रत्येक महिन्यात एटीएममधून 5 ट्रान्सेक्शन फ्री असतात. 5 पेक्षा जास्त वेळा ट्रान्झेक्शन केल्यास 21 रुपये चार्ज लागतो. 21 रुपये व्यतिरिक्त इतर टॅक्स घेतला जात नाही. एटीएममधून पैसे काढण्यासाठी वेगवेगळ्या बँकेची एटीएम वापरावीत. पैशांची देवाणघेवाण करण्यासाठी पेटीएम फोन पे गुगल पेचाही वापर करता येतो. त्यामुळे आमच्या पडताळणीत 4 ट्रान्झेक्शननंतर 173 रुपये चार्ज लागणार हा दावा असत्य ठरला.