बापरे! येत्या 15 नोव्हेंबरपर्यंत जगाची लोकसंख्या होणार तब्बल 'इतकी' कोटी, पृथ्वी भार सहन करणार?

Human Population: जगाच्या लोकसंख्येत लक्षणीय वाढ होत आहे, पाहा लोकसंख्येच्या दृष्टीने भारत कितव्या स्थानावर  

Updated: Nov 9, 2022, 09:50 PM IST
बापरे! येत्या 15 नोव्हेंबरपर्यंत जगाची लोकसंख्या होणार तब्बल 'इतकी' कोटी, पृथ्वी भार सहन करणार? title=

Population explosion Impact on Earth: जगात वाढती लोकसंख्या (Population) हा नेहमीच चिंतेचा विषय राहिला आहे. एका अहवालानुसार येत्या 15 नोव्हेंबरला पृथ्वीवरची लोकसंख्या तब्बल 800 कोटींचा टप्पा पार करेल. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या 12 वर्षात लोकसंख्येत तब्बल 100 कोटींची वाढ झाली आहे. बारा वर्षांआधी लोकसंख्या 700 कोटी होती, जी आता 800 करोडवर पोहोचेल. अशाच प्रश्न उपस्थित होतो, तो म्हणजे इतक्या मोठ्या लोकसंख्येचा भार पृथ्वी सह करु शकेल का? 

लोकसंख्या वाढीचा वेग
जगाच्या लोकसंख्यावाढीचा आधीचा वेग पाहिला तर सन 1804 मध्ये जगाची लोकसंख्या 100 कोटी होती, ती 200 कोटी होण्यास 123 वर्षांचा कालावधी जावा लागला. त्यानंतर 200 कोटी लोकसंख्येचे 300 कोटी होण्यास फक्त 33 वर्षे लागली आणि त्यानंतर 300 कोटींची 400 कोटी लोकसंख्या फक्त 14 वर्षांत झाली. जगाच्या लोकसंख्येने आतापर्यंत सातशे कोटींचा टप्पा ओलांडला आहे. आणि आता फक्त 12 वर्षात हा दर 800 कोटींवर पोहोचेल. UN DESA च्या वर्ल्ड पॉपुलेशन प्रॉसपेक्ट्स 2022 अहवालानुसार सन 2037 पर्यंत लोकसंख्या 900 कोटी आणि 2058 पर्यंत लोकसंख्येने 1000 कोटीचा टप्पा पार केला असेल. 

ज्या देशांचा प्रजनन दर जास्त तेथे धोका अधिक
वाढत्या लोकसंख्येमुळे आगामी काळात अनेक आव्हानं उभी रहाणार आहेत. हजार कोटींच्या लोकसंख्येला जगण्यासाठी कठिण परिस्थितीचा सामना करावा लागणार आहे. वर्ल्ड पॉपुलेशन प्रॉसपेक्ट्सच्या (World Population Prospects) मते ज्या देशात प्रजनन दर (Fertility Rate) जास्त आहे त्या देशांना धोका अधिक आहे. मनुष्य जंगल, पाणी आणि जमीन या नैसर्गिक (Nature) गोष्टींवर अवलंबून असतो. भविष्यात या गोष्टींसाठी मोठा संघर्ष करावा लागणार आहे. जमीनीसाठी नैसर्गिक जंगलं तोडून मनुष्य नैसर्गिक आपत्तींना आमंत्रण देत आहे. कार्बन उत्सर्जन वाढल्याने पृथ्वीवरील हिमनद्या पाण्यात बदलतील आणि ग्लोबल वॉर्मिंगचा धोका वाढेल. तसंच समुद्राची पातळीही झपाट्याने वाढेल. असे अनेक मोठे धोके भविष्यात दिसणार आहेत.

भारताची लोकसंख्या किती
लोकसंख्येच्या दृष्टीने भारत जगात सध्या दुसर्‍या क्रमांकावर आहे. पहिला क्रमांक चीनचा आहे. पण सध्याच्या भारतीय लोकसंख्यावाढीचे प्रमाण लक्षात घेता सन 2025 पर्यंत भारत चीनला मागे टाकून प्रथम क्रमांकावर येऊ शकेल. सध्याच्या जागतिक लोकसंख्येत भारताचा वाटा 17 टक्के आहे. दरवर्षी भारतीय लोकसंख्येत सुमारे 1.8 कोटींची भर पडते. या वेगाने सन 2050 पर्यंत भारतीय लोकसंख्या 153 कोटींवर पोहोचेल आणि तेव्हा चीनची लोकसंख्या 139 कोटी असेल.