आता सगळं मिळणार एकाच ठिकाणी, फेसबुकने आणले 'हे' नवीन फिचर

आजकाल फेसबुक हे रिल्ससाठी जास्त लोकप्रिय आहे.

Updated: Jul 23, 2022, 03:51 PM IST
आता सगळं मिळणार एकाच ठिकाणी, फेसबुकने आणले 'हे' नवीन फिचर title=

Facebook Feed Posts in Chronological Order: फेसबुकचे वापरकर्ते हे सध्या जगभर पसरलेले आहेत. आजकाल फेसबुक हे रिल्ससाठी जास्त लोकप्रिय आहे. दर दिवसाला हजारो ते लाखो लोक फेसबुकचा वापर करत असतात तसेच रिल्सही बनवत असतात. आजकाल फेसबुक हे अनेकांसाठी व्यक्त होण्याचे माध्यम बनले आहे. त्यामुळे अॅप हे नव्या फिचरसह अपडेट होत असते. 

यंदाही या फेसबुकने एक नवीन फिचर वापरकर्त्यांसाठी आणले आहे. या नव्या फिचर वापरकर्त्यांना चांगलाच फायदा करून घेता येणार आहे. फेसबुक 'फिड्स' नावाचं नवीन फिचर युझर्ससाठी घेऊन येणार आहे. ज्यात आपल्या फ्रेड्ससह फेसबुक ग्रुप्स, लाईक्ड पेज्स, सगळ्या फेसबुक अक्टिव्हिटीजचे पोस्ट हे chronological order मध्ये पाहता येणार आहेत. 

अशा प्रकारच्या फिचरची युझर्स फार आधीपासून वाट पाहत होते. कारण याआधी chronological order मध्ये पोस्ट्स पाहता येत नव्हते. News Feed वर आत्तापर्यंत फक्त random पोस्ट पाहता येतात आणि जर chronological order मध्ये पाहायचे असले तर त्यासाठी recent या ओप्शनवर जाऊन मग news feed जावे लागते पण आता युझर्सना एवढे कष्ट घेण्याची गरज नाही. फेसबुक आता हेच कष्ट हलके करणारे नवीन फिचर घेऊन आले आहे. 

हे फिचर इन्टाग्रामच्या following या फिचरशी मिळते जुळते आहे. सध्या तरी हे फिचर भारतात आले नसून लवकरच ते भारतात येण्याची शक्यता आहे. हे फिचर लवकरच android आणि ios उपलब्ध होण्याची शक्यता आहे. हे फिचर आले तर तूम्हाला तूमच्या फेवरेट्स, पेज्स, लाईक्ड पेज्स, ग्रुप्स आणि फेन्ड्सचे पोस्ट्स आणि सगळे फोटो, व्हिडिओ, रिल्स एकत्र आणि chronological order मध्ये पाहता येतील.
 
हे नवे फिचर वापरायला फार सोप्पं असेल. फीड्समध्ये विविध श्रेणी असतील ज्यात फेवरेट्स, पेज्स, लाईक्ड पेज्स, ग्रुप्स आणि फेन्ड्सचा समावेश असेल त्यातून या सर्व श्रेणीतील पोस्ट एकाच ठिकाणी पाहाण्यासाठी 'ऑल' असा ऑप्शन युझर्सना दिसेल ज्यातून तूम्ही सगळ्यांचे अपडेट्स chronological order ने पाहू शकता.