Crime News : लग्नानंतरही काहींचे अफेर बाहेर सुरू असल्याची अनेक प्रकरण आपण पाहिली आहेत. मात्र काहीवेळा या अफेरचा भांडाफोड झाल्यावर अनेकांचे संसार मोडले आहेत. (Extra marital affair News marathi) अशाच प्रकारचं एक प्रकरण समोर आलं आहे, ज्यामध्ये विवाहित मुलीचे लग्नानंतरही बॉयफ्रेंडसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून जन्मदात्या वडिलांनी नको ते पाऊल उचललं आहे. (extra marital affair father doght suspected married girl was having relationship with her boyfriend even after marriage then father finish boyfriend marathi crime news)
नक्की काय आहे प्रकरण?
उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) मेरठमधील (Merath) परीक्षितगड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दीपक त्यागी या तरूणाची हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करताना 6 पेक्षा जास्त लोकांना संशयित म्हणून ताब्यात घेत त्यांची चौकशी केली. पोलिसांच्या हाती काहीच धागेदोरे लागत नव्हते दुसरीकडे हत्येचा उलगडा होण्यास विलंब होत असल्याने सर्व हिंदू संघटना, त्यागी समाज आणि राजकीय पक्ष आक्रमक झाले होते. तपासाअखेर जे सत्य समोर आलं त्याने सर्वांनाच धक्का बसला.
दीपक त्यागी यी तरूणाची हत्या त्याच्या प्रेयसीच्या वडिलांनी केली होती. आरोपी वडिलांना त्यांच्या मुलीचे लग्नानंतरही अनैतिक संबंध असल्याचा संशय आला होता. संशयाच्या भूताचं खूळ त्यांच्या डोक्यामध्ये बसलं होतं. अखेर त्यांनी दीपक त्यागीला संपवून टाकण्याचं ठरवलं. आपल्या साथीदारासह त्यांनी ही हत्या केली.
दीपकची हत्या करत त्याचं मुंडकं तलवारीने कापलं आणि सिमेंटच्या पोत्यात भरलं. शेतामध्ये एक खड्डा खांदून त्यामध्ये ते पुरलं होतं. पोलिसांनी या प्रकरणाचा उलगडा करत आरोपी वडिल आणि त्याच्या साथीदाराला अटक केली आहे.