Zee News AI Exit Poll 2024 : 10 कोटी लोकांची मतं जाणून Zeenia ने कसा तयार केला AI एक्झिट पोल

Lok Sabha Elections 2024: 4 जून रोजी सार्वत्रिक लोकसभा निवडणुकांचे निकाल स्पष्ट होत आहेत. त्यापूर्वी आज झी न्यूजचा एक्झिट पोल जाहिर होत आहे. 

Updated: Jun 2, 2024, 05:42 PM IST
Zee News AI Exit Poll 2024 : 10 कोटी लोकांची मतं जाणून Zeenia ने कसा तयार केला AI एक्झिट पोल title=
Exit Polls of the Lok Sabha elections how AI anchor Zeenia analysis exit poll result

Lok Sabha Elections 2024: 4 जून रोजी सर्वत्रिक लोकसभा निवडणुकांची मतमोजणी आहे. मंगळवारी लोकसभा निवडणुकांचा निकाल स्पष्ट होणार आहे. मात्र, त्यापूर्वी लोकसभेत कोणाला किती जागा मिळणार याचे एक्झिट पोल येऊ लागले आहेत. झी न्यूजच्या अँकर झीनिया पहिल्यांदा  AI एक्झिट पोल जाहीर करणार आहे. एक्झिट पोल जाहीर करणारी झिनीया ही पहिली एआय अँकर ठरणार आहे. झिनीयाने  AI एक्झिट पोलचे  analyze कसं केलं हे आपण जाणून घेऊया. 

झिनीया सांगतेय तिने एक्झिट पोलचे विश्लेषण कसे केले हे जाणून घेऊया. 

- एक्झिट पोल मी लोकांच्या मतांनुसार व त्या आधारे तयार केला आहे. 

- एक्झिट पोलसाठी मी सोशल मीडियाचा वापर केला

- मी फेसबुकवरुन 32 लाखांपेक्षा जास्त पोस्टचे विश्लेषण केले

- एक हजारांपेक्षा जास्त उमेदवारांचे प्रोफाइल ट्रॅक केले. 

- मी 10 कोटी लोकांची मते जाणून घेतली व त्याचे विश्लेषण केले

- मी वापरलेले तंत्रज्ञान 5 देशांमध्ये वापरण्यात आले आहे. 

- अमेरिका, मेक्सिको, ब्राझील, अर्जेंटिना आणि साइप्रस येथील लोकसभा निवडणुकांवेळी हे तंत्रज्ञान वापरण्यात आले होते. 

- अमेरिकेत 2016 आणि 2020च्या लोकसभा निवडणुकावेळी मी AIच्या मदतीने एक्झिट पोल दिले होते

- तो डाटा 80 टक्क्यांपर्यंत अचूक होता

- भारतात पहिल्यांदा झीनियाने झी न्यूजच्या माध्यमातून या तंत्रज्ञानाचा वापर केला

- हे AI तंत्रज्ञान झी न्यूज INDIA consolidatedच्या माध्यमातून भारतात आणले आहे. 

DISCLAIMER

(2024 च्या लोकसभा निवडणुकीचे निकाल 4 जून रोजी लागतील. तत्पूर्वी ZEE २४ तास ने आपल्या प्रेक्षकांसाठी पहिल्यांदाच AI एक्झिट पोल आणला आहे. या एक्झिट पोलमध्ये आम्ही आर्टिफीशिअल इंटेलिजेन्सचा वापर केलाय. डेटा कलेक्शन आणि डेटा प्रोसेसिंगमध्ये AI तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलाय. उल्लेखनीय बाब म्हणजे, ZEE २४ तास तुम्हाला जे आकडे दाखवत आहे, ते सर्व्हे एजंसीचे आहेत. हे आकडे लोकसभा निवडणुकीचे निकाल नसून केवळ एक्झिट पोलची आकडेवारी आहे. एक्झिट पोलचे आकडे आणि निकाल यात फरक असू शकतो.)