मध्य प्रदेश निवडणुकीवर १५०० कोटींचा सट्टा, सत्ता बदलाला पसंती

मध्य प्रदेशच्या निकालावरून सट्टाबाजार तेजीत आहे.  

सुरेंद्र गांगण | Updated: Dec 7, 2018, 06:43 PM IST
मध्य प्रदेश निवडणुकीवर १५०० कोटींचा सट्टा, सत्ता बदलाला पसंती title=

नवी दिल्ली : मध्य प्रदेशच्या निकालावरून सट्टाबाजार तेजीत आहे. मध्य प्रदेशात काँग्रेस भाजपाला जोरदार टक्कर देईल, यावर मोठा सट्टा लागलाय.  मध्यप्रदेशात सत्तांतर होण्यासाठी अंदाजे १ हजार कोटींचा सट्टा लागलाय. तर राज्यात भाजप-काँग्रेसमध्ये अटीतटीची लढत होईल, यावर ५०० कोटींचा सट्टा लागलाय. 

दरम्यान, राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान पार पडल्यानंतर विविध सर्वेक्षण संस्थांच्या एक्झिट पोलची आकेडवारी समोर आलेय. त्यानुसार राजस्थानमधील मतदारांनी भाजप आणि काँग्रेसला आलटून-पालटून सत्ता देण्याचा प्रघात कायम राखला आहे. त्यामुळे सत्ताधारी वसुंधरा राजे सरकारला पायउतार व्हावे लागणार आहे आणि सत्तेची सूत्रे काँग्रेसच्या हातात येतील अशी आकडेवारी जाहीर झालेय.

दरम्यान, मध्य प्रदेशमध्ये सत्ता बदलाला सर्वाधिक सट्टा लागलाय. तर काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार टक्कर होईल, असा कल दिसून येत आहे. त्यामुळे सट्टा बाजार तेजीत आहे. दुसरीकडे शिवराजसिंग चौहान चौथ्यांदा मुख्यमंत्री होतात की कमलनाथ किंवा ज्योतिरादित्य शिंदे यांची वर्णी लागते, यावरही जोरदार सट्टा लागलाय.

छत्तीसगडमध्ये काँग्रेसचा हात

- काँग्रेसचे पुन्हा सरकार बनण्याची शक्यता. भाजपला ३५-४३, काँग्रेसला ४०-५० आणि मायावतींच्या बसपाला ३-७ जागा मिळण्याची शक्यताः रिपब्लिक-सीव्होटरचा अंदाज.

- छत्तीसगडमध्ये रमन सिंह चौथ्यांदा भाजपचे सरकार बनवण्याची शक्यता. इंडिया टीव्ही-सीएनएक्सचा अंदाज.

- छत्तीसगडमध्ये भाजपला ३८ टक्के, काँग्रेसला ४१ टक्के तर जेसीसला १३ टक्के मते मिळण्याची शक्यता. न्यूज नेशनचा अंदाज.

तेलंगणात पुन्हा चंद्रशेखर राव

तेलंगणात पुन्हा एकदा चंद्रशेखर राव यांचे सरकार बनणार असल्याचा अंदाज. टीआरएसला ६६, भाजपला ७, काँग्रेसला ३७ तर अन्य पक्षांना ९ जागा. रिपब्लिक आणि सी व्होटरचा अंदाज.

राजस्थानात सत्ता पालट होणार

- काँग्रेसला ४२ टक्के, तर भाजपला ३७ टक्के आणि इतरांना २१ टक्के मते मिळण्याची शक्यता. इंडिया टूडे आणि अॅक्सिस माय इंडियाचा अंदाज.

काँग्रेसला १०५ जागा तर भाजपला ८५ जागा मिळतील. राजस्थानात काँग्रेस सरकार स्थापणार. टाइम्स नाउ-सीएनएक्सचा अंदाज.