...तर एकाच दिवशी होणार सर्वांचा पगार; सरकार घेणार निर्णय

सरकार कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेण्याची शक्यता

Updated: Nov 16, 2019, 12:31 PM IST
...तर एकाच दिवशी होणार सर्वांचा पगार; सरकार घेणार निर्णय title=
संग्रहित फोटो

नवी दिल्ली : मोदी सरकार वेग-वेगळ्या सेक्टरमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेणार असल्याची शक्यता आहे. सध्या सरकार 'एक देश, वेतन का दिन एक' (One Nation One Pay Day) या सिद्धांतावर काम करत आहे. सर्व कर्मचाऱ्यांना एकाच दिवशी पगार मिळावा हा सरकारचा यामागचा उद्देश आहे.

केंद्रीय मंत्री संतोष गंगवार (Santosh Gangwar) यांनी सांगितलं की, देशातील सर्व कर्मचाऱ्यांना एकाच दिवशी पगार मिळावा यासाठी केंद्र सरकार 'देश एक, वेतन का दिन एक' ही योजना आणण्याची तयारी करत आहे. संघटित क्षेत्रातील कर्मचार्‍यांचे हित लक्षात घेऊन सरकार या प्रणालीच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्न करत आहे.

संतोष गंगवार म्हणाले की, विविध क्षेत्रातील कर्मचार्‍यांचे पगार वेळेत मिळण्यासाठी देशभर एकाच दिवशी पगाराची तरतूद व्हायला हवी. यासाठी लवकरच कायदा व्हावा अशी पंतप्रधान नरेंद्र मोदींची इच्छा आहे.

  

सिक्युरिटी लीडरशिप समिट, २०१९ मध्ये त्यांनी सांगितलं की, कर्मचाऱ्यांचं हित लक्षात घेता, सरकार सर्व क्षेत्रात समान वेतन मिळण्यासाठीही काम करत असल्याची माहिती त्यांनी दिली.