गावकऱ्यांनी केलेल्या मदतीवर हत्तीणीने 'अशी' व्यक्त केली कृतज्ञता...

प्राण्यापेक्षा मनुष्याला बु्द्धी अधिक असली तरी काही वेळेस प्राण्यांमधला समजूतदारपणा दिसून येतो.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Dec 9, 2017, 08:02 PM IST
गावकऱ्यांनी केलेल्या मदतीवर हत्तीणीने 'अशी' व्यक्त केली कृतज्ञता... title=

केरळ : प्राण्यापेक्षा मनुष्याला बु्द्धी अधिक असली तरी काही वेळेस प्राण्यांमधला समजूतदारपणा दिसून येतो.

काही प्रसंग तर असे असताच की ज्यातून प्राण्यांकडून आपण शिकू शकतो. आता हेच पहा ना.. हत्तीसारखा बलाढ्य प्राणी पण त्याच्यातला समजूतदारपणा, जाणीवा जागृत असल्याचे या प्रसंगातून दिसून येते. 

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

आपल्या पिल्लाला माणसांनी वाचवल्यानंतर हत्तीच्या कळपाने चक्क सोंड उंचावून एकत्र गावकऱ्यांना अभिवादन केलं. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

त्याच झालं असं... हत्तीच्या कळपातील एक लहानसं पिल्लू नदी पार करताना दलदलीत अडकलं. कळपानं या पिल्लाला रात्रभर वाचवण्याचा प्रयत्न केला पण त्यांचे प्रयत्न व्यर्थ ठरले. दुसऱ्या दिवशी वनविभागाचे अधिकारी तेथे आले. त्यांनी गावकऱ्यांच्या मदतीनं तासभर खटपट करून त्यांनी या पिल्लाला बाहेर काढलं. 

कृतज्ञता व्यक्त केली

या मदतीची जाणीव ठेवत हत्तीच्या कळपाने त्यांच्या पद्धतीने कृतज्ञता व्यक्त केली. हत्तीच्या कळपाने सोंड वर उंचावून चित्कार केला आणि ते जंगलात निघून गेले.
प्राण्यांची ही कृतज्ञता पाहून गावकरी भारावून गेले.

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तसंच तो अडीच लाखांहून अधिक लोकांनी पाहीला आहे.