Eknath Shinde यांच्याकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल; जाणून घ्या प्रमुख मुद्दे

विधानसभा अध्यक्षांनी 16 आमदार विरोधात केलेल्या कारवाईला स्थगिती देण्यासंदर्भातची याचिका सुप्रीम कोर्टात दाखल झालीय. गटनेता निवड पद्धती चुकीची असल्याचा दावाही याचिकेत केलाय.

Updated: Jun 27, 2022, 09:54 AM IST
Eknath Shinde यांच्याकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल; जाणून घ्या प्रमुख मुद्दे title=

रामराजे शिंदे, नवी दिल्ली : विधानसभा अध्यक्षांनी 16 आमदार विरोधात केलेल्या कारवाईला स्थगिती देण्यासंदर्भातची याचिका सुप्रीम कोर्टात दाखल झालीय. गटनेता निवड पद्धती चुकीची असल्याचा दावाही याचिकेत केलाय. त्या शिवाय संजय राऊत यांनी जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या आहेत. या वक्तव्या संदर्भातले पुरावे कोर्टासमोर सादर केले जाणार आहेत. एकनाथ शिंदेंनी याचिकेत कोण कोणते मुद्दे मांडले आहेत… पाहू या…

1. विधानसभा अध्यक्षांनी आज 5 वाजे पर्यंत म्हणणे मांडण्याची मुदत दिलीय. डिसक्वालिफिकीशन साठी 7 दिवसांचा वेळ द्यावा लागतो. परंतु स्पीकरनं 2 दिवसांचा कालावधी दिली. त्यामुळे उपाध्यक्षांच्या नोटीसाला स्थिगिती देण्याची मागणी केली गेलीय. 

2. स्पीकरच्या विरोधात अविश्वास ठराव आणला आहे. 34 जणांची सही आहे.. यावर कोर्टानं निर्णय घ्यावा.

3. अजय चौधरीं आणि सुनिल प्रभूंची गटनेता आणि प्रतोद पदाची नियुक्ती चुकीच्या पद्धतीने केली आहे. या दोघांच्या नियुक्तीला स्थगिती द्या. कारण 17 आमदारांच्या सहीने ठराव करून गटनेते पद दिलं गेलं. पण आमच्याकडे जास्त आहेत.

यात दुसरा मुद्दाः त्या ठरावात 24 आमदारांनी सह्या केल्या आहेत. त्यापैकी दादा भुसे आणि उदय सामंत , केसरकर यांसह 10 आमदार  एकनाथ शिंदे गटात आले आहेत. त्यांनी आपला निर्णय वापस घेतला आहे..

4. एकनाथ शिंदे गटाच्या 16 जणांवर शिस्तभंग कारवाईची केली. पण त्यातील पण काही आमदार एकनाथ शिंदे गटाकडे आले.

5. गटनेत्यांची नियुक्ती हे निवडून आलेले आमदार करतात, पक्ष प्रमुख नाही. म्हणून स्पीकरनं अजय चौधरींची केलेली नियुक्ती चुकीची आहे.

6. एकीकडे आम्हाला बोलवता आणि दुसरीकडे संजय राऊत आम्हाला धमक्या देत आहेत… जीवे मारण्याची धमकी देताहेत…

7. सुनिल प्रभू आणि अजय चौधरींनी पक्षाचे लेटर हेड वापरू नये असे याचिकीत दिले आहेत.