नीरव मोदीच्या घरावर ईडीचा छापा, मिळाली १० कोटींची अंगठी,१.४० कोटींचीे घड्याळं

नीरव मोदीच्या मुंबईतील 'समुद्र महाल' या घरावर छापेमारी करण्यात आले. गुरूवारपासून सुरू असलेली ही छापेमारी शनिवारी सकाळपर्यंत सुरू होती. 

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Mar 24, 2018, 07:33 PM IST
नीरव मोदीच्या घरावर ईडीचा छापा, मिळाली १० कोटींची अंगठी,१.४० कोटींचीे घड्याळं  title=

मुंबई : पंजाब नॅशनल बॅंकेला करोडो रूपयांचा चुना लावून विदेशात पळालेल्या नीरव मोदीच्या घरावर ईडी आणि सीबीआयच्या संयुक्त टीमने छापे टाकले. या छाप्यांमध्ये चक्क २६ कोटी रूपयांपेक्षाही अधिक किंमतीची माया सापडली. यात महागडी ज्वेलरी, साधारण १० कोटी रूपयांची एक अंगठी, महागडी पेंटींग्ज सापडली आहेत.

तीन दिवस छापेमारी सुरू

ईडीच्या अधिकाऱ्याच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, नीरव मोदीच्या मुंबईतील 'समुद्र महाल' या घरावर छापेमारी करण्यात आले. गुरूवारपासून सुरू असलेली ही छापेमारी शनिवारी सकाळपर्यंत सुरू होती. छापेमारीदरम्यान,  १५ कोटी रूपयांची एंटीक ज्वेलरी, १.४० कोटी रूपये किंमतीची महागडी घड्याळे जप्त करण्यात आली. यात सुप्रसिद्ध चित्रकार एम. एफ हुसेन, के. के. हिब्बर , अमृता शेरगिल यांच्या पेंटींग्जचाही समावेश आहे.

२५१ मालमत्तांवर पडले आहेत छापेमारी

दरम्यान, तपास पथकाने १३,५४० कोटी रूपयांच्या घोटाळप्रकरणी डायमंड ज्वेलर्स आणि त्याचे चाचा गीतांजी ग्रुपचे मेहुल चौक्सी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर त्यांच्या जवळपास २५१ मालमत्तांवर छापे टाकण्यातआले आहेत. यात हिरे, सेने, प्रिसयस आणि सेमी प्रसियस स्टोन, मोती जप्त करण्यात आले आहेत.