नवी दिल्ली : अरुणाचल प्रदेशात शनिवारी दुपारी भूकंपाचे तीव्र झटके जाणवले आहेत. सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास भूकंपाचे झटके जाणवले गेले आहेत. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ५.२ एवढी नोंदवण्यात आली आहे.
भूकंपाचा केंद्रबिंदू अरुणाचल प्रदेशातील ११४ किमी दूर असल्याची माहिती समोर येत आहे. भूकंपाच्या झटक्यांनंतर नागरिकांना घर आणि कार्यालयाबाहेर धाव घेतली. नागरिकांमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं.
Earthquake of 5.2 magnitude struck 114 km from Teju in #ArunachalPradesh
— ANI (@ANI) June 2, 2018
या भूकंपात कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचं वृत्त नाहीये.