Presidential Election 2022 : भारताच्या राष्ट्रपतीपदी द्रौपदी मुर्मू

भारताच्या राष्ट्रपतीपदी (Presidential Election 2022) एनडीएच्या द्रौपदी मुर्मू (Draupdi Murmu) यांची वर्णी लागली आहे. 

Updated: Jul 21, 2022, 07:50 PM IST
Presidential Election 2022 : भारताच्या राष्ट्रपतीपदी द्रौपदी मुर्मू title=

नवी दिल्ली :  भारताच्या राष्ट्रपतीपदी (Presidential Election 2022) एनडीएच्या द्रौपदी मुर्मू (Draupdi Murmu) यांची वर्णी लागली आहे. द्रौपदी यांच्या रूपाने देशाला पहिली आदिवासी समुदायातील व्यक्ती राष्ट्रपती म्हणून लाभली आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकांसाठी सोमवारी 18 जुलै रोजी मतदान झालं होतं. अखेर त्याचा आज निर्णय लागला आहे. (draupadi murmu elected as the 15th president of india)

मृर्मू यांच्या घराबाहेरही जोरदार जल्लोष

द्रौपदी मृर्मू यांचा विजय  झालाय. त्या देशाच्या 15 व्या राष्ट्रपती झाल्या आहेत. त्यामुळे देशासह अनेक भागात जल्लोष पाहायला मिळतोय. राष्ट्रपती द्रौपदी मृर्मू यांच्या घराबाहेरही जोरदार जल्लोष करण्यात आला. मुंबईत भाजप कार्यालयाबाहेरही कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवत आनंद साजरा केला तर नागपुरात भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. 

भाजपप्रणित एनडीएतर्फे द्रौपदी मुर्मू आणि विरोधी पक्षांच्या वतीने यशवंत सिन्हा (Yashwant Sinha) हे दोन उमेदवार रिंगणात होते. द्रौपदी मुर्मू यांचं या निवडणुकीत  पारडं जड असल्याचं मत याआधीच राजकीय निरीक्षकांनी व्यक्त केलं होतं.

भारताच्या 16 व्या राष्ट्रपती पदासाठी 8 जुलैला निवडणुक पार पडली. या निवडणुकीत एकुण 4 हजार 800 खासदार आणि आमदारांनी मतदानात सहभाग घेतला. द्रौपदी मुर्मू यांना 27 पक्षांचा पाठिंबा होता. तर यशवंत सिन्हा यांना 14 पक्षांचं समर्थन होतं.

पहिल्या महिला आदिवासी राष्ट्रपती

देशात आतापर्यंत आदिवासी समुदायातील कोणीही व्यक्ती राष्ट्रपती बनलेली नव्हती. मात्र द्रौपदी यांच्या रूपाने देशाला पहिला आदिवासी राष्ट्रपती मिळालाय.

भारताचे आतापर्यंतचे राष्ट्रपती 

अनु. क्रमांक  राष्ट्रपतीचं नाव कार्यकाळ
1 राजेंद्र प्रसाद 1950-1962
2 सर्वपल्ली राधाकृष्णन 1962-1967
3 झाकीर हुसेन 1967-1969
4  व्ही.व्ही.गिरी 1969-1974
5 फखरुद्दीन अली अहमद 1974-1977
6 नीलम संजीव रेड्डी 1977-1982
7 ग्यानी झैल सिंग 1982-1987
8 आर.व्यंकटरमण 1987-1992
9 शंकर दयाळ शर्मा 1992-1997
10 के.आर.नारायणन 1997-2002
11 ए.पी.जे. अब्दुल कलाम 2002-2007
12 प्रतिभाताई पाटील 2007-2012
13 प्रणब मुखर्जी 2012-2017
14 रामनाथ कोविंद 2017-2022
15 द्रौपदी मुर्मु 2022-2027 पर्यंत