चीनने पाडलं भारतीय हवाई दलाचं विमान ?

तेजपूरमधून उड्डाण भरल्यानंतर काही वेळेतच चीन सीमेच्या जवळ बेपत्ता झालेलं भारतीय हवाई दलाचं युद्ध विमान सुखोई-30 चा भाग आढळून आला. पण हे विमान कसं कोसळलं याबाबत आता नवीन माहिती समोर येत आहे. 

Updated: May 29, 2017, 01:26 PM IST
चीनने पाडलं भारतीय हवाई दलाचं विमान ? title=

आसाम : तेजपूरमधून उड्डाण भरल्यानंतर काही वेळेतच चीन सीमेच्या जवळ बेपत्ता झालेलं भारतीय हवाई दलाचं युद्ध विमान सुखोई-30 चा भाग आढळून आला. पण हे विमान कसं कोसळलं याबाबत आता नवीन माहिती समोर येत आहे. 

१०० तासांनंतर सुखोई क्रॅश झाल्यामागे चीनचा हात असू शकतो अशी शंका उपस्थित केली जात आहे. सुखोई-३० हे युद्ध विमान मंगळवारी सकाळी 9.30 वाजता नियमित ट्रेनिंगसाठी आकाशात उडालं पण 11.30 वाजता तेजपूरपासून 60 किलोमीटर उत्तरेस चीनच्या सीमेजवळ अरुणाचल प्रदेशच्या दोउलसांगमध्ये विमानाचा संपर्क तुटला. 72 तासानंतर विमानाचे अवशेष तेथेच मिळाले जेथे त्याचा संपर्क तुटला.

सुखोई हे हवाईदलाचं महत्त्वाचं विमान आहे. 358 कोटी त्याची किंमत आहे. हे विमान 4.5 जेनरेशनचं आहे. जगभरात श्रेष्ठ लढाऊ विमानांच्या यादीत ते येतं. कोणत्याही वातावरणात ते भरारी घेऊ शकतं. सोप्या प्रकारे त्याला पाडता येत नाही पण सिस्टम हॅक करुन देखील ते पाडलं गेलं असेल अशी देखील शंका उपस्थित केली जात आहे.