नवी दिल्ली : देशाची आंतरिक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देणाऱ्या नक्षलवाद्यांनी काही दिवसांपूर्वी भारतीय जवानांवर हल्ला केला होता. ज्यामध्ये सीआरपीएफचे अनेक जवान मारले गेले होते. सुकमा हल्ल्यातील शहीद सीआरपीएफच्या जवानांच्या कुटुंबियांना मदत केल्यामुळे अभिनेता अक्षय कुमार आणि बॅडमिंटनपटू सायना नेहवालला धमकी आली आहे. आर्थिक मदत केल्यामुळे पीपल्स लिबरेशन गुरिल्ला आर्मीने याची निंदा केली.
अक्षय कुमार नेहमी भारतीय जवानांच्या मदतीसाठी पुढे येतो. त्याने शहीद जवानांच्या कुटुंबियांना आर्थिक मदतीसाठी 'भारत के वीर' असा एक अॅप देखील बनवला आहे. हा अॅप भारत सरकारसोबत बनवण्यात आला आहे. मागील महिन्यात तो लॉन्च करण्यात आला आहे. यावेळी गृहमंत्री राजनाथ सिंह देखील उपस्थित होते.
सायना नेहवाल हिने देखील शहिदांच्या कुटुंबियांना मदत केली होती. अभिनेता विवेक ओबरॉयने देखील शहीद जवानांच्या कुटुंबियांना २५ फ्लॅट दिले होते.