मिम्समधून जगभरात पोहोचलेल्या काबोसू श्वानाच्या चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी

Kabuso Dog Death:  'डोगे" मिम्स आणि डिजिटल करन्सीला प्रेरणा देणाऱ्या श्वानाचे शुक्रवारी अखेरचा श्वास घेतला.

Updated: May 24, 2024, 03:09 PM IST
मिम्समधून जगभरात पोहोचलेल्या काबोसू श्वानाच्या चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी title=
Kabosu dog Death

Kabuso Dog Death: तुम्ही सोशल मीडियात सतत अॅक्टीव्ह असाल, मीम्स पाहायची तुम्हाला आवड असेल तर काबोसू श्वानाला तुम्ही कधी ना कधी नक्कीच पाहिले असेल. मागच्या एका दशकात काबोसु श्वानाचा फोटो प्रतिक्रिया देण्यासाठी वापरला जातोय. 

'डोगे' मेम आणि डोगेकॉइन शिबा इनू कुत्रा काबोसू मरण पावला. तो रक्ताच्या कर्करोगाने ग्रस्त होता, अशी माहिती पुढे येत आहे. 'डोगे" मिम्स आणि डिजिटल करन्सीला प्रेरणा देणाऱ्या श्वानाचे शुक्रवारी अखेरचा श्वास घेतला.

अधिकृत क्रिप्टोकरन्सीच्या ट्विटरवर अकाऊंटवरुन याची माहिती देण्यात आली आहे. 'काबोसू हा आमच्या समुदायाचा मित्र आणि आमच्या समुदायाची प्रेरणा होता.  त्यांनी काबोसूच्या लोकप्रियतेबद्दल माहिती दिली. 

काबोसूचा जगभरात असलेला प्रभाव अतुलनीय आहे. तो लोकांच्या आठवणीत कायम राहील. आम्ही सर्व भाग्यवान आहोत की त्याने आम्हाला स्पर्श केला आणि आमच्या आयुष्याला आकार दिला, असे या पोस्टमध्ये म्हटलंय.

काबोसु श्वान ल्युकेमिया आणि यकृताच्या गंभीर आजाराने त्रस्त होता, असे सांगण्यात येत आहे. काबोसू "डोगे" मिम्स म्हणून जगभरात प्रसिद्ध झालाय. ज्यामुळे क्रिप्टोकरन्सी डॉगकॉइनची निर्माती झाली.  ज्याने जगभरातील चाहत्यांवर आपली छाप सोडली.

काबोसुच्या मालकाने एका ब्लॉग पोस्टमध्ये घडलेल्या घटनेबद्दल खुलासा केला आहे. 26 मे रोजी दुपारी 1 ते 4 या वेळेत नारिता शहरातील कोत्सु नो मोरी येथील फ्लॉवर काओरी येथे "काबो-चानसाठी निरोपाची पार्टी" आयोजित करण्यात आली आहे. मृत्यूच्या आदल्या रात्री काबोसूने नेहमीप्रमाणे भात खाल्ला आणि भरपूर पाणीदेखील प्यायला होता, असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटलंय.