डिलिव्हरी बॉय झाला इंजिनिअर... गरज फक्त चिकाटी आणि मेहनतीची

दिवस बदलतील ते फक्त मेहनतीने..., डिलिव्हरी बॉयचा इंजिनिअरपर्यंत यशस्वी प्रवास   

Updated: May 30, 2022, 03:06 PM IST
डिलिव्हरी बॉय झाला इंजिनिअर...  गरज फक्त चिकाटी आणि मेहनतीची  title=

मुंबई : मेहनत करण्याची इच्छा असेल तर आपण कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होऊ शकतो. त्यामुळे एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे, ती म्हणजे कोणतंही काम छोट नसतं. त्याचं छोट्या कामामध्ये आपल्याला यशाच्या उच्च शिखरापर्यंत पोहोचवण्याची ताकद असते. सध्या सोशल मीडियावर एका डिलिव्हरी बॉयची स्टोरी व्हायरल होत आहे. 

साधा डिलिव्हरी बॉय एका आता एका मोठ्या कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करत आहे. या मुलाचं नाव शेख अब्दुल सत्तार असं आहे.  अब्दुलचा संघर्ष अनेकांना प्रेरणा देणारा आहे. 

आंध्र प्रदेश येथील विशाखापट्टनम येथे राहणाऱ्या अब्दुलने घर खर्च भागवण्यासाठी  Zomato, Swiggy डिलिव्हरी बॉयचं काम केलं. शिवाय त्याने Ola, Uber मध्ये ड्रायव्हरचं काम देखील केलं. अब्दुलने Rapido मध्ये ग्राहकांना मोटरसायकलवर राईड देखील दिली आहे. 

डिलिव्हरी बॉय, ड्रायव्हर यांसारखी कामे सत्तारने कॉलेजच्या शेवटच्या वर्षात केली आहे. घरची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे आपल्याला आपल्या कुटुंबाला आर्थिक मदत करण्यासाठी त्याने काम करण्याचा निर्णय घेतला. 

दरम्यान, त्याच्या एका मित्राने त्याला कोडिंग शिकण्याची प्रेरणा दिली. त्यानंतर सत्तारने संध्याकाळी 6 ते 12 या वेळेत होम डिलिव्हरीचे काम केले आणि उर्वरित वेळेत कोडिंगचे धडे गिरवले. 

कठोर परिश्रम आणि चिकाटीने त्याने स्वतःचे एक वेब ऍप्लिकेशन तयार केले, ज्यामुळे घरच्यांना आर्थिक मदत करण्यात खूप मदत मिळाली. कोडिंग शिकल्यानंतर त्याने भाषेवर देखील प्रभुत्व मिळवलं 

आता शेख अब्दुल सत्तार सध्या NxtWave नावाच्या कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करत आहेत. शेख अब्दुल सत्तारचा हा संघर्ष प्रत्येक तरुणांसाठी प्रेरणा देणारा आहे.