मुंबई : UPSC नागरी सेवा परीक्षा 2021 चा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. ज्यामध्ये श्रुती शर्मा हिने पहिला क्रमांक पटकावला आहे. परीक्षेला बसलेले उमेदवार आयोगाच्या upsc.gov.in या वेबसाइटला भेट देऊ शकतात. मिळालेल्या माहितीनुसार, श्रुती शर्मा जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या RCAची विद्यार्थिनी आहे.
युपीएससी नागरी सेवा परीक्षा 749 उमेदवारांनी उत्तीर्ण केली आहे. त्यामध्ये उत्तरीर्ण 180 उमेदवारांची भारतीय प्रशासन सेवा( IAS),37 भारतीय परराष्ट्र सेवा (IFS), 200 भारतीय पोलीस सेवा (IPS)साठी निवड करण्यात आली आहे.
इतर गट अ आणि गट ब अधिकाऱी पदांसाठी 332 उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या वर्षी टॉप थ्रीमध्ये मुलींनी बाजी मारली आहे.
पहिला क्रमांकः श्रुती शर्मा
दुसरा क्रमांकः अंकिता अग्रवाल
तिसरा क्रमांकः गामिनी सिंगला
चौथा क्रमांक ऐश्वर्या वर्मा