भिंत फोडून आत घुसली मेट्रो!

दिल्ली मेट्रोची मेजेन्टा लाईन सुरू होण्यापूर्वीच या लाईनवर एक अपघात घडलाय. 

Updated: Dec 19, 2017, 05:56 PM IST
भिंत फोडून आत घुसली मेट्रो! title=

नवी दिल्ली : दिल्ली मेट्रोची मेजेन्टा लाईन सुरू होण्यापूर्वीच या लाईनवर एक अपघात घडलाय. 

मंगळवारी सकाळी मेट्रोची ट्रायल सुरू असताना हा अपघात घडलाय. कालिंदी कुंज डेपची भिंत फोडून मेट्रो ट्रेन लटकली. 

मेट्रो कालिंदी कुंज डिपो की दीवार से टकराकर हादसे का शिकार हो गई
मेट्रोला अपघात

नोएडाच्या बोटॅनिकल गार्डनहून दिल्लीच्या कालकाजी भागाला ही मेट्रो जोडणार आहे. दिल्लीच्या या नव्या मेट्रो लाईनचं २५ डिसेंबर रोजी उद्घाटन होणार आहे. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या ९३ व्या जन्मदिवसाला पंतप्रधान नरेंद्र मोदी बोटॅनिकल गार्डन मेट्रो स्टेशनहून हिरवा झेंडा दाखवत ही लाईन सुरू करणार आहेत.