दिल्लीत आपची मुसंडी, फळविक्रेत्यांकडून फुकटात संत्री वाटप

 एका फळविक्रेत्याने फुकटात संत्र्यांचं वाटप केलं 

Updated: Feb 11, 2020, 11:45 AM IST
दिल्लीत आपची मुसंडी, फळविक्रेत्यांकडून फुकटात संत्री वाटप  title=

दिल्ली : दिल्ली निवडणुकीबाबत आत्तापर्यंत जे निकाल हाती आले आहेत त्यात आप अर्थात आम आदमी पार्टीने मुसंडी मारली आहे. त्यामुळे आपच्या कार्यालयात फुंग्यांनी, फुंलांनी सजावट करण्यात आली आहे. तसंच रस्त्यारस्त्यावर सर्वसामान्य व्यक्ती, तसंच आप कार्यकर्त्यांचा जल्लोष दिसून येतोय. आप कार्यकर्त्यांकडून पेढे, लाडू वाटप करण्यात येतंय..तर चक्क एका फळविक्रेत्याने फुकटात संत्र्यांचं वाटप केलं.

दिल्ली निवडणुकीच्या निकालातआप ने मारलेली मुसंडी पाहाता ठिकठिकाणी जल्लोष सुरु आहे. मिठाईचं वाटप करण्यात येतंय..यावेळी चक्क एका फळविक्रेत्याने आपच्या या आनंदाच सहभागी होण्यासाठी संत्र्यांचं फुकटात वाटप केलं.

यावेळी संत्री घेण्यासाठी लोकांची गर्दीही जमली आहे. अरविंद केजरीवाल जनतेसाठी काम करतात त्यामुळे त्याचं यश निश्चित असल्याचं मला आधीपासूनच माहित होतं म्हणून हे संत्र्यांचं वाटप केल्याचं फळविक्रेत्याचं म्हणणं आहे. 

 दिल्लीकरांचा कौल कोणाला ?

दिल्ली विधानसभा 2020 च्या निकालाकडे सगळ्यांच लक्ष लागून राहिलं आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या (Delhi Assembly Elections 2020) ७० जागांकरता  (70 Seats) झालेल्या मतदानाचा आज निकाल जाहीर होणार आहे. सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरूवात झाली आहे. आतापर्यंतच्या निकालात आपने मुसंडी मारल्याचे चित्र आहे. काँग्रेसला अद्याप खातंही उघडता आलं नाही. त्यामुळे दिल्लीकरांचा कौल नक्की कुणाला असणार आहे? याकडे साऱ्यांच लक्ष लागून राहिलं आहे.