आयटी रिटर्न भरण्याची मुदत वाढली

आयटी रिटर्न भरण्याची मुदत वाढण्यात आली आहे. आता येत्या पाच ऑगस्टपर्यंत आयटी रिटर्न भरता येणार आहे.

Updated: Jul 31, 2017, 04:18 PM IST
आयटी रिटर्न भरण्याची मुदत वाढली  title=

नवी दिल्ली : आयटी रिटर्न भरण्याची मुदत वाढण्यात आली आहे. आता येत्या पाच ऑगस्टपर्यंत आयटी रिटर्न भरता येणार आहे. करदात्यांना ऑनलाईन रिटर्न भरताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन आयकर विभागानं हा निर्णय घेतलाय.

२०१६-१७ या आर्थिक वर्षासाठीचा आयटी रिटर्न भरण्याची मुदत आज संपणार होती. पण आज सकाळपासूनच आयकर विभागाच्या वेबसाईटवर करदात्यांची कमालीची गर्दी झाली. त्यामुळे सकाळपासून आयटी रिटर्न भरण्याची प्रक्रिया पूर्णपणे ठप्प झाली होती.  

करदात्यांनी सोशल मीडियावरून जोरदार ओरड सुरू केली. अनेक खासदारांनीही अर्थमंत्री अरुण जेटलींकडे तक्रार करून वेबसाईट बंद पडल्याची माहिती दिली. अखेर आज सकाळपर्यंत मुदतवाढ होणार नसल्याचे सांगणारा अधिकारी वर्ग दुपारी तीनच्या सुमारास वरमला. आयकर विभागानं ट्विटर हँडलवरून मुदतवाढ जाहीर केली.