Govt Job: सेंट्रल वेअरहाउसिंग कॉर्पोरेशनमध्ये अकाउंटंटसह विविध पदांची भरती, 'येथे' पाठवा अर्ज

CWC MT Recruitment 2024: सेंट्रल वेअरहाउसिंग कॉर्पोरेशन भरती अंतर्गत व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी, अकाऊंटंट, कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक आणि अधीक्षकांसह अनेक पदे भरली जाणार आहेत. 

Pravin Dabholkar | Updated: Dec 14, 2024, 10:36 AM IST
Govt Job: सेंट्रल वेअरहाउसिंग कॉर्पोरेशनमध्ये अकाउंटंटसह विविध पदांची भरती, 'येथे' पाठवा अर्ज title=
सेंट्रल वेअरहाउसिंग कॉर्पोरेशनमध्ये नोकरी

CWC MT Recruitment 2024: तुम्हाला सेंट्रल वेअरहाउसिंग कॉर्पोरेशन (CWC) मध्ये नोकरी मिळवायची इच्छा असेल, तर तुमच्यासाठी ही एक चांगली संधी आहे. या संस्थेने अनेक पदांसाठी रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. त्यासाठी महामंडळाने भरतीची नोटिफिकेशनही जारी करण्यात आले आहे. यामध्ये रिक्त पदांची संख्या, अर्जाची शेवटची तारीख, पगार याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.  इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागवण्यात आले आहेत. सेंट्रल वेअरहाउसिंग कॉर्पोरेशन भरती अंतर्गत व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी, अकाऊंटंट, कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक आणि अधीक्षकांसह अनेक पदे भरली जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात.

रिक्त जागांचा तपशील

व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (सामान्य) ची 40 पदे, व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (तांत्रिक) ची 13 पदे, अकाऊंटंटची 9 पदे,अधीक्षक (जी) ची 22 पदे, कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक 81 पदे, अधीक्षक (जी) ची 2 पदे,कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक – SRD (NE) ची 10 पदे, आणिकनिष्ठ तांत्रिक सहाय्यक – SRD (केंद्रशासित प्रदेश लडाख) ची 2 पदे भरली जाणार आहेत. 

पात्रता आवश्यकता

या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून एमबीए/पीजी/बीकॉम/बीए/कॉमर्स/सीए/कृषी/प्राणीशास्त्र/रसायनशास्त्र/बायोकेमिस्ट्रीमध्ये पदवी पूर्ण केलेली असावी. 

वयोमर्यादा

या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा 28 ते 30 वर्षांच्या दरम्यान असावी.

कशी होईल निवड?

सेंट्रल वेअरहाउसिंग कॉर्पोरेशनच्या या भरतीसाठी निवड प्रक्रियेनुसार, उमेदवारांना प्रथम लेखी परीक्षेला बसावे लागेल. यामध्ये यशस्वी उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलावले जाईल. यानंतर तुम्हाला मुलाखतीच्या फेरीत हजेरी लावावी लागेल.

अर्ज शुल्क

सामान्य, ईडब्ल्यूएस आणि ओबीसी प्रवर्गातील पुरुष उमेदवारांना अर्ज आणि माहिती शुल्कासह 1250 रुपये जमा करावे लागतील. तर  एससी, एसटी, दिव्यांग, माजी सैनिक आणि महिला उमेदवारांना माहिती शुल्क म्हणून केवळ 400 रुपये भरावे लागतील.

कसा कराल अर्ज 

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट cewacor.nic.in वर जा.'करिअर' विभागात क्लिक करा आणि नोंदणी करा.अर्जात योग्य तपशील भरा. फोटो, सही आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.अर्ज शुल्क भरा आणि फॉर्म सबमिट करा. आता
फॉर्मची प्रिंटआउट घ्या.

अर्जाची शेवटची तारीख 

सेंट्रल वेअरहाउसिंग कॉर्पोरेशनच्या या भरती अंतर्गत इच्छुक उमेदवार 14 डिसेंबर 2024 ते 12 जानेवारी 2025 या कालावधीत विविध पदांसाठी अर्ज भरू शकतात. यानंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, याची नोंद घ्या.

अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x