नवरात्रीत नरबळी दिल्यास मुल होईल! तांत्रिकाच्या सांगण्यावरुन त्याने एका मुलीवर पाळत ठेवली आणि संधी मिळताच...

तांत्रिकाच्या सल्लानंतर त्याने अनेक दिवस आपल्या घराबाहेर येणाऱ्या लहान मुलीवर पाळत ठेवली. एकदिवस संधी साधत आरोपीने त्या मुलीचं अपहरण केलं आणि... 21 व्या शतकात नरबळीच्या घटनेने देश हादरला

Updated: Mar 27, 2023, 08:24 PM IST
नवरात्रीत नरबळी दिल्यास मुल होईल! तांत्रिकाच्या सांगण्यावरुन त्याने एका मुलीवर पाळत ठेवली आणि संधी मिळताच... title=

Tiljala Shockign News : 21 व्या शतकातही अंधश्रद्धेचं (Superstition) भूत लोकांच्या मानगुटीवर किती घट्ट बसलंय याचं धक्कादायक उदाहण समोर आलं आहे. स्वत:ला मुल होत नसल्याने दुसऱ्याच्या मुलाचा नरबळी (Human Sacrifice) दिल्याचं उघडकीस आलं आहे. नवरात्रीत नरबळी दिल्यास अपत्यप्राप्ती (Child) होईल असं एका जोडप्याला तांत्रिकाने (Wizard) सांगितलं. यावर विश्वास ठेवत आरोपींना एका सात वर्षांच्या मुलीचं अपहरण (Kidnapped) करत निर्घृणपणे तिची हत्या केली. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून पोलीस तपासात अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत.

काय आहे नेमकी घटना?
बिहारच्या (Bihar) समस्तीपूर भागात राहाणारा आरोपी आलोक कुमार याचं 2016 मध्ये लग्न झालं. कामानिमित्ताने तो आणि त्याची पत्नी कोलकातामधल्या तिलजलामध्ये राहायला आले. लग्नाला अनेक वर्ष होऊन गेल्यानंतरही मुल होत नसल्याने आलोक आणि त्याची पत्नी नैराश्यात होते. नातेवाईक आणि शेजारच्यांकडून टोमणे ऐकायला मिळत असल्याने आलोक त्रस्त होता. या टोमण्यातून सुटका मिळवण्यासाठी आलोकने एकेदिवशी आपल्या शेजारच्यांना पत्नी गर्भवती असल्याचं खोटं सांगितलं.

पत्नीवर कोणचाही संशय येऊ नये म्हणून आलोकने आपल्या पत्नीला बिहारला पाठवून दिलं. मुलं होण्यासाठी काय करावं या चिंतेत असताना अलोकला कोलकाता इथल्या निमतला भागातील एका तांत्रिकाची माहिती मिळाली. आलोकने त्या तांत्रिकाला गाठलं आणि आपली समस्या सांगितवली. यावर त्या तांत्रिकाने आलोकला अघोरी सल्ला दिला. नवरात्रीच्या काळात सात ते आठ वर्षांच्या मुलीचा बळी दिल्यास अपत्यप्राप्ती होईल असं त्या तांत्रिकाने सांगितलं. 

आरोपीने मुलीवर पाळत ठेवायला सुरुवात केली
तांत्रिकाने दिलेला सल्ला आलोकच्या डोक्यात घुमत होता. तांत्रिकाने सांगितल्यानुसार आलोक सात ते आठ वर्षांच्या मुलीच्या शोधात होता. आलोक राहात असलेल्या ठिकाणी एक मुलगी सकाळी सात ते आठ वाजण्याचा दरम्यान कचरा फेकण्यासाठी येत असल्याचं आलोकने पाहिलं होतं. आलोकने त्या मुलीवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. 

आलोकने अखेर डाव साधलाच
रविवारी सकाळी नेहमीप्रमाणे ती मुलगी कचरा फेकण्यासाठी कचराकुंडीजवळ आली, सकाळची वेळ असल्याने रस्त्यावर तुरळक रहदारी होती. या संधीचा फायदा उचलत आलोकने त्या मुलीचं तोंड दाबलं आणि तिला उचलून आपल्या प्लॅटमध्ये आणलं. फ्लॅटमध्ये आणल्यावर आरोपीने त्या मुलीच्या डोक्यार हातोड्याने जोरदार प्रहार करायला सुरुवात केली. त्यानंतर आलोकने त्या मुलीला एका गोणपाटात भरलं आणि त्यावर हातोड्याने अनेक वार केले. गंभीर हल्ल्याने मुलीचा जागीच मृत्यू झाला. 

कुटुंबियांकडून मुलीचा शोध सुरु
इथे बराचवेळ मुलगी परत न आल्याने तिच्या कुटुंबियांकडून शोधाशोध सुरु झाली. मुलगी मिळत नसल्याने अखेर त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ परिसरात तपास सुर केला. आसपासच्या तब्बल 32 फ्लॅटमध्ये पोलिसांनी शोध घेतला. तपास करत असताना पोलीस आलोकच्या फ्लॅटमध्ये गेली. सुरुवातीला अलोकने पोलिसांना उडवाउडवीची उत्तरं दिली. पण त्याचे घाबरलेले हावभाव पाहिल्यानंतर पोलिसांना संशय आला. अखेर पोलिसी खाक्या दाखवताच आलोकने आपणच त्या मुलीची हत्या केल्याची कबुली दिली.