मुस्लिमांनीही उपचारासाठी गोमुत्र वापरावे- रामदेव बाबा

मुस्लिमांनीदेखील उपचारासाठी गोमूत्राचा उपयोग करावा असा सल्ला  योगगुरु आणि पतंजलीचे संस्थापक बाबा रामदेव यांनी दिला आहे.  गोमूत्र उपचारांसाठी वापरता येते असे कुरानमध्ये असे लिहिल्याची पुष्टीही त्यांनी जोडली आहे. "आप की अदालत" या टीव्ही कार्यक्रमात ते बोलत होते.

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Oct 1, 2017, 10:52 AM IST
 मुस्लिमांनीही उपचारासाठी गोमुत्र वापरावे- रामदेव बाबा  title=

नवी दिल्ली: मुस्लिमांनीदेखील उपचारासाठी गोमूत्राचा उपयोग करावा असा सल्ला  योगगुरु आणि पतंजलीचे संस्थापक बाबा रामदेव यांनी दिला आहे.  गोमूत्र उपचारांसाठी वापरता येते असे कुरानमध्ये असे लिहिल्याची पुष्टीही त्यांनी जोडली आहे. "आप की अदालत" या टीव्ही कार्यक्रमात ते बोलत होते.

काही लोक पतंजलींची प्रतिमा एक हिंदू कंपनी म्हणून करत आहेत. मी कधी हमदर्दवर टीका केली नाही. हमदर्द आणि हिमालय औषध कंपनीला पूर्ण सहकार्य आहे. हिमालया ग्रुपच्या फारुक भाईंनी मला योगग्रामची जागा दान केली आहे. जर काही लोक त्यासाठी शुल्क घेत असतील तर ते फक्त द्वेषाची भिंत उभारत असल्याचे रामजेव बाबांनी सांगितले.
दरम्यान यावेळी बाबा रामदेव यांनी पतंजली ग्रुपचा उत्तराधिकारी नेमण्याची योजना आखल्याचे सांगितले. पतंजल समूहाचा उत्तराधिकारी म्हणून रामदेव बाबांनी प्रशिक्षित केलेली ५०० साधूंची टीम असणार आहे.