पाच राज्यांना मिळाले नवे राज्यपाल

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज आसाम, बिहार, अरुणाचल प्रदेश, तामिळनाडू आणि मेघालय या पाच राज्यांमध्ये नव्या राज्यपालांची नियुक्ती केली. यासोबतच केंद्रशासित प्रदेश अंदमान निकोबारच्याही उपराज्यपालचींही नियुक्ती केली.

Updated: Sep 30, 2017, 08:56 PM IST
पाच राज्यांना मिळाले नवे राज्यपाल title=

नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज आसाम, बिहार, अरुणाचल प्रदेश, तामिळनाडू आणि मेघालय या पाच राज्यांमध्ये नव्या राज्यपालांची नियुक्ती केली. यासोबतच केंद्रशासित प्रदेश अंदमान निकोबारच्याही उपराज्यपालचींही नियुक्ती केली.

बनवारी लाल पुरोहित यांची तामिळनाडूच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली. तर सत्यपाल मलिक यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली. 

जगदीशमुखी यांची आसामच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली. अरुणाचल प्रदेश आणि मेघालयचे राज्यपाल यांचीही नियुक्ती करण्यात आली.