Covishield, Covaxin किंवा Sputnik-V तुम्हाला दिलेली लस बनावट तर नाही ना? हे ओळखायचं कसं केंद्राने दिली माहिती

केंद्र सरकारने राज्यांना अशी अनेक मानके सांगितली आहेत, ज्याच्या आधारावर तुम्हाला दिलेली लस खरी आहे की, बनावट आहे हे तुम्हाला माहित करुन घेता येईल.

Updated: Sep 6, 2021, 06:41 PM IST
Covishield, Covaxin किंवा Sputnik-V तुम्हाला दिलेली लस बनावट तर नाही ना? हे ओळखायचं कसं केंद्राने दिली माहिती title=

मुंबई : जगभरात कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी एकमेव पर्याय लोकांच्या समोर आला आहे, तो म्हणजे लसीकरण करणे. त्यामुळे जगभरात युद्ध पातळीवर सगळ्याच नागरीकांचे लसीकरण सुरू आहे. परंतु यादरम्यान अनेक ठिकाणी बनावट लस दिल्या जात असल्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या. आंतरराष्ट्रीय बाजारातही बनावट लसींचा धंदा उघडकीस आले आहे. सध्या दक्षिणपूर्वी आशिया आणि आफ्रिकेत बनावट कोविडशील्डच्या लसी सापडल्या आहेत. त्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने या बनावट लसींबद्दल सर्वांना चेतावणी दिली आहे.

केंद्र सरकारने राज्यांना अशी अनेक मानके सांगितली आहेत, ज्याच्या आधारावर तुम्हाला दिलेली लस खरी आहे की, बनावट आहे हे तुम्हाला माहित करुन घेता येईल.

केंद्र सरकारने शनिवारी सर्व राज्यांना या संदर्भात पत्र लिहिले आहे. एका मीडिया रीपोर्टनुसार या पत्रात COVAXIN, Covishield आणि Sputnik V लसांशी संबंधित प्रत्येक माहिती देण्यात आली आहे. जेणेकरून या लस बनावट आहेत की, नाही हे निश्चित करता येईल. कारण सध्या या तीन लसींसह देशात लसीकरण मोहीम राबवली जात आहे.

फरक ओळखण्यासाठी, तिन्ही लसींचे लेबल, रंग, ब्रँड नेम बद्दल माहिती खाली शेअर केली गेली आहे.

कोविशील्ड (COVISHIELD)

-SII चे प्रोडक्ट लेबलचा रंग गडद हिरव्या रंगाचा असतो.
- ट्रेड मार्कसह ब्रँड नाव (COVISHIELD) असे असते
- जेनेरिक नावाचा 'टेक्ट फॉन्ट' ठळक अक्षरांमध्ये नसते.
- CGS NOT FOR SALE असे देखील त्यावर ओव्हरप्रिंट केले जाईल.

कोव्हॅसीन (COVAXIN)

- लेबलवर इनविझीबल म्हणजेच अदृश्य UV हेलिक्स आहे, जे केवळ UV लाइट खालीच पाहिले जाऊ शकते.
-लेबल क्लेम डॉट्सच्या मधे लहान अक्षरांमध्ये लपलेला टेक्ट आहे, ज्यामध्ये COVAXIN लिहिले असते.
-कोव्हॅसीनमध्ये 'X'चा दोन रंगांमध्ये असणे, याला ग्रीन फॉइल इफेक्ट म्हणतात.

स्पुतनिक-व्ही (Sputnik V)

स्पुतनिक-व्ही लस रशियातील दोन वेगवेगळ्या प्लांटमधून आयात केली गेली असल्याने, त्या दोघांची लेबल देखील थोडे वेगळे आहेत. परंतु त्यावरील सर्व तपशील आणि डिझाइन एक सारखेच आहेत, केवळ त्यावरील निर्मात्याचे नाव वेगळे आहे.

आतापर्यंत आयात केलेल्या सर्व लसींपैकी केवळ 5 एमपूल पॅकेट्सवर इंग्रजीमध्ये लेबल लिहिलेले आहे. याशिवाय, उर्वरित पॅकेटमध्ये हे रशियन भाषेत लिहिलेले आहे.