जीव वाचवण्यासाठी लोक उलट्या पावली पळाले, पाहा landslide चा थरारक व्हिडीओ

जीवावर बेतलं आणि पुढे त्यांनी काय केलं पाहा.... व्हिडीओ

Updated: Sep 6, 2021, 06:02 PM IST
जीव वाचवण्यासाठी लोक उलट्या पावली पळाले, पाहा landslide चा थरारक व्हिडीओ title=

शिमला: गाड्याही थांबल्या आणि लोकही घाबरले कारण चक्क मोठी दरड कोसळली. लोकांना आपला जीव वाचवण्यासाठी उलट्या पावली पळ काढावा लागला. दरड कोसळल्याचा थरारक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ इतका भयंकर आहे की तो पाहूनही थरकाप उडेल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे काही लोक या दरड कोसळण्याचा व्हिडीओ काढण्यासाठी आपला जीव धोक्यात घालत आहेत. 

हिमाचल प्रदेशची राजधानी शिमला इथल्या ज्योरी परिसरात राष्ट्रीय महामार्ग 5 वर ही घटना घडली. मोठ्या प्रमाणात दरड कोसळल्यानं काहीकाळ वाहतूक ठप्प झाली आहे. सध्या इथे कोणती जीवितहानी झाली की नाही याची माहिती समोर आलेली नाही. मात्र दरड कोसळल्याचे दोन व्हिडीओ वेगानं व्हायरल होत आहेत. 

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता मोठी झाडं आणि दगड खाली कोसळत आहेत. मोठ्या प्रमाणात ही दरड कोसळली आहे. यावेळी तिथे खूप लोक होते. अनेकांनी आपला जीव वाचवण्यासाठी आल्यापावली उलटा पळ काढला. तर काही लोकांनी जीव धोक्यात घालून हे दृश्यं आपल्या कॅमेऱ्यात कैद केलं. 

हिमाचलमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये दरड कोसळण्याचं प्रमाण वाढत आहे. याआधी 25 जुलै रोजी किन्नौरच्या सांगला-चितकुल रस्त्यावर मोठ्या प्रमाणात दरड कोसळली होती. यामध्ये 9 लोक ठार झाले, तर तीन लोक जखमी झाले होते. हिमाचलमध्ये मुसळधार पावसामुळे सतत भूस्खलनाच्या घटना समोर येत आहेत.