देशात या राज्यात कोविड-19चे नवीन रुग्ण वाढल्याने चिंतेत भर, 11 टक्के जास्त कोरोनाचा संसर्ग

 महाराष्ट्र आणि दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये, नवीन प्रकरणांची संख्या लक्षणीयरीत्या कमी झाली आहे. परंतु या दरम्यान, केरळमध्ये कोविड -19 च्या सतत वाढत्या नवीन रुग्णसंख्येमुळे चिंता वाढली आहे.  

Updated: Jul 29, 2021, 09:40 AM IST
देशात या राज्यात कोविड-19चे नवीन रुग्ण वाढल्याने चिंतेत भर, 11 टक्के जास्त कोरोनाचा संसर्ग  title=

मुंबईः भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटाचा वेग मंदावला आहे. महाराष्ट्र आणि दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये, नवीन प्रकरणांची संख्या लक्षणीयरीत्या कमी झाली आहे. परंतु या दरम्यान, केरळमध्ये कोविड -19 च्या सतत वाढत्या नवीन रुग्णसंख्येमुळे चिंता वाढली आहे. गेल्या 2 दिवसांपासून राज्यात दररोज 22 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. जी देशभरातील रोजच्या 50 टक्क्यांहून अधिक आहे.

केरळमध्ये 24 तासांत 22056 नवीन रुग्ण समोर  

बुधवारी केरळमध्ये न 24 तासांत कोविड -19 चे 22056 नवीन रुग्ण आढळले आणि संसर्ग होण्याची एकूण संख्या 33 लाख 27 हजार 301 इतकी झाली आहे, तर या विषाणूमुळे 131 मृत्यू झालेत. तर मृत्यू झालेल्यांची संख्या 16457 पर्यंत वाढली आहे.  या दरम्यान, 17761 लोक कोरोनातून बरे झाले होते, त्यामुळे एकूण बरे झालेल्या लोकांची संख्या 31 लाख 60 हजार 804 वर गेली आहे आणि आता राज्यात कोरोना  सक्रिय रूग्णांची संख्या 1 लाख 49 हजार 534 आहे.

केरळमध्ये कोरोना संसर्ग दर 11.2 टक्के 

केरळमध्ये गेल्या 4 आठवड्यांपासून केरळमधील कोरोना संसर्गाचा आलेख सतत वाढत आहे. गेल्या 24 तासात राज्यात 1 लाख 96 हजार 902 नमुन्यांची चाचणी करण्यात आली आणि संसर्ग दर 11.2 टक्के नोंदविला गेला. राज्यभरात आतापर्यंत 2 कोटी 67 लाख 33 हजार 694 नमुन्यांची चाचणी करण्यात आली आहे.

 नवीन कोरोना रुग्णांमध्ये जुलैमध्ये झपाट्याने वाढ 

जुलै महिन्यात केरळमध्ये कोविड -19मधील सरासरी नवीन रुग्ण 11 हजारांवर आली होती, परंतु त्यानंतर आता नव्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. देशभरात मे महिन्यात दुसर्‍या लाटेच्या उद्रेकामुळे कोरोना रुग्णसंख्या सातत्याने कमी होत आहेत आणि बुधवारी 24 तासांत देशभरात 43654 नवीन कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत.

 27 जुलै रोजी 22 हजार रुग्णवाढ

यापूर्वी मंगळवारी (27 जुलै) केरळमध्येही कोविड -19चे  22 हजाराहून अधिक नवीन रुग्ण आढळले. मंगळवारी राज्यात कोरोना रुग्णांची संख्या 22129 नोंदली गेली, तर 156 रुग्णांचा मृत्यू झाला. कोरोना चाचणी संसर्ग दर (टीपीआर) देखील 12 टक्क्यांहून अधिक नोंदविला गेला आहे.