4 तासांसाठी बूक केली OYO रुम, 8 तासानंतरही बाहेर येईनात, दरवाजा उघडून पाहिलं तर दोघं अशा स्थितीत सापडले की...

दिल्लीच्या जाफराबाद परिसरात एका जोडप्याने 4 तासांसाठी रुम बूक केली होती. पण 7 तास झाले तरी दोघे रुममधून बाहेर न आल्याने हॉटलेच्या कर्मचाऱ्यांनी दरवाजा ठोठावला. पण दरवाजा न उघडल्याने पोलिसांना बोलावण्यात आलं. दरवाजा उघडल्यानंतर एकच खळबळ उडाली.   

शिवराज यादव | Updated: Oct 28, 2023, 09:59 AM IST
4 तासांसाठी बूक केली OYO रुम, 8 तासानंतरही बाहेर येईनात, दरवाजा उघडून पाहिलं तर दोघं अशा स्थितीत सापडले की... title=

राजधानी दिल्लीच्या जाफराबाद पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मौजपूर मेट्रो स्टेशनवळील OYO किंग स्टे नावाच्या एका हॉटेलमध्ये प्रियकराने प्रेयसीची गळा दाबून हत्या केली. यानंतर प्रियकराने पंख्याला गळफास लावून घेत जीवन संपवलं. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी संपूर्ण आढावा घेतली. पोलिसांना घटनास्थळी एक सुसाइड नोटही सापडली आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर पूर्व दिल्लीच्या जाफराबाद येथे ही घटना घडली. मौजपूर मेट्रो स्टेशनजवळ OYO किंग स्टे हॉटेलमध्ये चेकआऊटची वेळ झाल्यानंतर जेव्हा जोडपं बाहेर आलं नाही तेव्हा हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना शंका आली. यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर हॉटेल कर्मचाऱ्यांनी त्यांच्यासमोरच दरवाजा उघडला. यावेळी दोघेही मृतावस्थेत सापडले.

हॉटेलच्या तिसऱ्या माळ्यावरील रुममध्ये बेडवर 27 वर्षीय आयशाचा मृतदेह पडलेला होता. तर तिचा प्रियकर सोहराबचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत होता. प्रियकराने आधी प्रेयसीची गळा दाबून हत्या केली आणि नंतर स्वत: गळफास घेत आयुष्य संपवलं असा अंदाज आहे 

4 तासांसाठी बूक केली होती रुम

हे जोडपं दुपारी 1 वाजता हॉटेलमध्ये पोहोचलं होतं. हॉटेल कर्मचाऱ्यांच्या माहितीनुसार, जोडप्याने 4 तासांसाठी रुम बूक केला होता. पण 8 वाजल्यानंतर ते बाहेर आले नाहीत तेव्हा दरवाजा ठोठावण्यात आला. जेव्हा आतून आवाज आला नाही, तेव्हा हॉटेल कर्मचाऱ्यांनी जाफराबाद पोलिसांना याची माहिती दिली. 

जाफराबाद पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन दरवाजा उघडला असता आत दोघांचेही मृतदेह पडले होते. पोलिसांना घटनास्थळी सुसाईड नोट सापडली आहे ज्यामध्ये लिहिलं होतं की, आम्ही एकमेकांवर खूप प्रेम करतो. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. 

उत्तर पूर्व दिल्लीचे डीसीपी जॉय टिर्की यांना दिलेल्या माहितीनुसार, जोडप्याची ओळख पटली आहे. मृत 28 वर्षीय सोहराब उत्तर प्रदेशच्या मेरठचा रहिवासी आहे. तर 27 वर्षीय आयशा विवाहित होती. तिचा पती व्यावसायिक आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.