कोरोनाच्या वेगाला ब्रेक, एका दिवसात 3400 पेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू

Coronavirus Update: देशातील कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या अनियंत्रित वेगाने थोडा ब्रेक लागला आहे. (Coronavirus in India)  

Updated: May 3, 2021, 11:27 AM IST
कोरोनाच्या वेगाला ब्रेक, एका दिवसात 3400 पेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू title=

मुंबई : Coronavirus Update: देशातील कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या अनियंत्रित वेगाने थोडा ब्रेक लागला आहे. (Coronavirus in India) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत भारतात कोरोनाचे 3,68,147 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्याच वेळी, कोरोना संसर्गामुळे 3,417 लोकांचा मृत्यू झाला.

देशातात कोरोनाची एकूण रुग्णसंख्या : 1,99,25,604 असून बरे झालेले रुग्ण : 16,29,3003 आहेत. तर मृत्यूची संख्या : 2,18,959 पोहोचली आहे. देशात सक्रिय रुग्णसंख्या : 34,13,642 इतकी आहे. या आकडेवारीनुसार आतापर्यंत 15,71,98,207 लोकांना देशात कोरोना लस (Corona Vaccine) दिली गेली आहे. 

1 मे रोजी हा आकडा 4 लाखांच्या पुढे  

कोरोना त्सुनामीचे भयानक दृश्य भारतात दिसत आहे. 1 मे रोजी, 401,993 नवीन कोरोनाची रुग्णांची संख्या नोंदली गेली आणि 3523 संक्रमित लोकांच्या मृत्यूची नोंद झाली. एका अहवालानुसार एप्रिलमध्ये एकूण 69,36,034 नवीन रुग्णसंख्या नोंदविण्यात आली. गेल्या वर्षीच्या तीन महिन्यांच्या एकूण आकड्यांपेक्षा हा आकडा जास्त आहे. ज्यावेळी कोरोनाचा सर्वाधिक धोका होता. ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर 2020 मध्ये एकूण 64.9 लाख रुग्णसंख्या नोंदली गेली. याशिवाय एप्रिलमध्ये कोरोना मृत्यूचे प्रमाणही खूप जास्त होते.

2 मे रोजी देशात आलेल्या आकडेवारीनुसार 3,92,488 नवीन कोरोना रुग्णसंख्या पाहायला मिळाली. यासह, 24 तासांत 3,689 रुग्णांच्या मृत्यूनंतर मृतांचा आकडा 2,15,542 वर पोचला होता. विशेष म्हणजे, देशातील कोरोना विषाणूच्या दुसर्‍या लाटेवर मात करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि राज्य सरकारांना लॉकडाऊनवर विचार करण्यास सांगितले आहे.

लॉकडाऊन दरम्यान दुर्बल घटकांच्या संरक्षणाची व्यवस्था करावी, असे न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयाने म्हटले आहे की, ते लॉकडाऊनच्या सामाजिक-आर्थिक परिणामाशी परिचित आहेत, विशेषत: गरीबांवर त्याचा सर्वात मोठा प्रभाव आहे. म्हणूनच जर लॉकडाऊन लादण्याची गरज भासली असेल तर सरकारने आधी गरिबांच्या गरजा भागविण्याची व्यवस्था करावी. 

राज्यांनी कडक धोरण अवलंबिले

कोरोनाचे वाढते प्रकरण लक्षात घेता राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे. त्याचबरोबर ओडिशा सरकारनेही 5 ते 14 दिवसांपर्यंत राज्यात संपूर्ण लॉकडाऊन जाहीर केले आहे. रविवारी हरियाणा सरकारनेही आजपासून म्हणजेच 3 मेपासून संपूर्ण राज्यात सात दिवसांची लॉकडाऊन लागू करण्याची घोषणा केली. तर महाराष्ट्रात 15 मे पर्यंत लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. तर 31 मेपर्यंत निर्बंध कायम राहणार आहेत.