घरपोच ऑक्सिजन सिलेंडर पोहोचवणार, असे करा रजिस्ट्रेशन !

 प्रत्येक जिल्ह्यात 20 ऑक्सिजन सिलिंडरचा कोटा 

Updated: May 6, 2021, 11:10 AM IST
घरपोच ऑक्सिजन सिलेंडर पोहोचवणार, असे करा रजिस्ट्रेशन ! title=

नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीत होम आयसोलेशनमध्ये राहणाऱ्या कोरोनाव्हायरस संक्रमित लोकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. यांना आपातकालीन ऑक्सिजन घरी पोचवण्यासाठी सरकार ऑक्सिजन पूल तयार करत आहे. डीएम स्वत: या ऑक्सिजन पूलवर देखरेख ठेवणार आहेत.

ऑक्सिजन सिलेंडर कसे मिळवायचे?

डीएम कोविड रुग्णाच्या आजाराची तीव्रत पाहतील. त्यावरुन रुग्णाच्या घरी ऑक्सिजन द्यायचे की नाही हे ठरवतील. दिल्लीच्या आरोग्य विभागाने प्रत्येक जिल्ह्यात 20 ऑक्सिजन सिलिंडरचा कोटा दिला आहे.

यावेळी दिल्लीमध्ये 50 हजाराहून अधिक रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. जर शरीरात ऑक्सिजन पातळीची कमतरता असेल तर प्रत्येकजण रुग्णालयात जातो. त्यानंतर भीती वाढते. अशा परिस्थितीत, दिल्ली सरकार रूग्णांना घरी ऑक्सिजन उपलब्ध करुन देईल, ज्यामुळे रुग्णालयांमध्ये गर्दी कमी होते.

पुरवठ्यात मदत करण्यासाठी रिक्त ऑक्सिजन सिलिंडर दान करण्याचे आवाहन दिल्ली सरकारने जनतेला केले आहे. राजघाट डीटीसी बस आगार हे एक केंद्र बनविण्यात आले आहे. तेथे ऑक्सिजन सिलिंडर दान करता येतील. अधिक माहितीसाठी लोक 011-23270718 वर देखील कॉल करू शकता अशी माहिती आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी आशिष कुंद्रा यांनी दिली.

असे करा रजिस्ट्रेशन 

होम आयसोलेशनमध्ये राहणाऱ्या कोरोना रुग्णांसाठी दिल्ली सरकारच्या (Delhi Govt) www.delhi.gov.in या पोर्टलवर नोंदणी करून ऑक्सिजन सिलिंडर घेऊ शकतात. नोंदणीसाठी फोटो, आधार कार्ड, ओळखपत्र आणि कोरोना चाचणी अहवाल आवश्यक आहे. जर सीटी स्कॅन केले असेल तर त्याचा अहवाल पोर्टलवर देखील अपलोड केला जाऊ शकतो.

पोर्टलवर नोंदणी केल्यानंतर, डीएम कोविड रुग्णाला ऑक्सिजन सिलिंडर देतील. गरज भासल्यास रिफिलिंग प्लांटमधून सिलिंडर पुन्हा भरण्यासाठी पासही देण्यात येईल.