मुंबई : कोरोनाची तिसरी लाट आटोक्यात (Corona third wave) आलीय असं वाटत असतानाच पुन्हा एकदा रूग्णवाढीची भीती व्यक्त होतीय. कोरोनाच्या नव्या व्हेरियंटनं साऱ्या जगाचं टेन्शन वाढवलंय. भारतात लवकरच कोरोनाची चौथी लाट येईल असा अंदाज शास्त्रज्ञांनी वर्तवलाय. आयआयटी कानपूरच्या (IIT Kanpur) शास्त्रज्ञांनी याबाबत एक धक्कादायक इशारा दिलाय. काय आहे हा इशारा, पाहूयात. (corona fourth wave will come june 2022 iit kanpur researchers predict)
भारतात लवकरच कोरोनाची चौथी लाट?
आयआयटी कानपुरमधील शास्त्रज्ञांच्या दाव्यानुसार भारतात 22 जूनपर्यंत कोरोनाची लाट येईल. या लाटेचा प्रभाव 24 ऑक्टोबरपर्यंत राहिल. 15 ते 31 ऑगस्ट दरम्यान सर्वाधिक रूग्णवाढ असेल. जवळपास चार महिने ही लाट राहिल. कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा रूग्णांवर किती परिणाम होईल हे लसीकरण आणि बुस्टर डोसवर अवलंबून असेल असंही तज्ज्ञांनी म्हंटलंय.
विशेष म्हणजे आयआयटी कानपूरच्या तज्ज्ञांनी कोरोनाबाबत आतापर्यंत जितके अंदाज वर्तवले आहेत त्यातील बहुतांश आकडेवारी खरी ठरलीय. कोरोनाची तिसरी लाट फेब्रुवारीमध्ये सुरू होईल आणि नंतर कोरोना रूग्णांची संख्या कमी कमी होत जाईल असं भाकित या तज्ज्ञांनी डिसेंबर 2021 मध्येच केलं होतं. त्यामुळे कोरोनाला हलक्यात घेऊ नका कारण संकट अद्याप टळलेलं नाही.